औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांच्या दुकानांना भीषण आग
औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या दुकानांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या, पाण्याच्या गाड्या आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहे
पाहा आणखी फोटो...
जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांचा बाजार भरतो. मात्र आज तिथे एका स्टॉलला आग लागली. मैदानात साधारण 150 दुकानं आहेत. दुकानं एकमेकांना लागूनच असल्याने आग पसरली.
पाहा आणखी फोटो...
पाहा आणखी फोटो...
पाहा आणखी फोटो...
पाहा आणखी फोटो...
पाहा आणखी फोटो...
मैदानातील सर्वच्या सर्व 150 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं म्हटलं जात आहे. तर 25 ते 30 चारचाकी आणि अनेक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीनंतर फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने परिसर दणाणला आहे. या मैदानाच्या शेजारीच रहिवासी इमारती असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. रहिवासी परिसर सोडून सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत.