आज दिवसभरात... 31 जानेवारी 2019

Background
1. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात, दोन्ही सभागृहांमध्ये सकाळी 11 वाजता राष्ट्रपतींचं भाषण, उद्या अर्थसंकल्प सादर होणार
2. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस, प्रकृती ढासळत असल्याने चिंता, लोकपालच्या नियुक्तीसाठी एल्गार, ग्रामस्थांचाही बंद पाळत उपोषणाला पाठिंबा
3.विश्व हिंदू परिषदेची आजपासून धर्म संसद, मोहन भागवतांसह दिग्गजांची हजेरी,तर 21 फेब्रुवारीला साधूसंत राम मंदिरासाठी पहिली वीट रचणार
4. दोन दिवस राज्यभरात थंडीची लाट कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज, परभणीचा पारा 6.5 अशांवर, यवतमाळचा पाराही खालावला
5. सात हजार विद्यार्थ्यांचा 'एक सूर एक ताल', अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेचा उपक्रम, पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आदरांजली
6. चौथ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, विराटला विश्रांती देऊन रोहित शर्माकडे नेतृत्व, तर शुभमन गिलचंही वनडेत पदार्पण


















