आज दिवसभरात... 30 जानेवारी 2019

Background
1. मराठा अशी कोणतीही स्वतंत्र जात नाही, आरक्षणासाठी मराठा समाज पात्र, राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्वाळा
2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बळीराजाला मदतीचा हात, महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींचा निधी, इतर दुष्काळग्रस्त राज्यांनाही मदत
3. भाजपच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठका, युतीवर कुठलीच चर्चा नाही, मात्र बैठकीत युती होईल अशी अपक्षा व्यक्त
4. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे हातमिळवणी करण्याची शक्यता, राष्ट्रावादी मनसेला दोन जागा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा
5. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस, सत्तेत आल्यास किमान वेतनानंतर आता महिलांना आरक्षण देण्याची राहुल गांधींची घोषणा
6. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची आज 71 वी पुण्यतिथी, अभिवादनासाठी नेतेमंडळी राजघाटावर, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

















