आज दिवसभरात... 28 जानेवारी 2019

Background
1. मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी, मागास प्रवर्गाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्यावर निर्णय होणार
2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र, भाजपची जालन्यात तर शिवसेनेची मुंबई बैठक, राजकीय प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता
3. पोकळ स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते, नितीन गडकरींचा सूचक इशारा, गडकरी मोदींविरोधात बोलल्याची दबक्या आवाजात चर्चा
4. आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणात तपास अधिकाऱ्याची बदली, चौकशीला विलंब केल्याचा ठपका, सीबीआयकडून मात्र अधिकृत निवेदन नाही
5. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, घटनापीठापुढील उद्याची सुनावणी रद्द, न्यायमूर्ती बोबडे अनुपस्थित राहणार असल्याने निर्णय
6. भारत-न्यूझीलंड दरम्यान आज तिसरा एकदिवसीय सामना, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, मालिका विजयाची भारताला संधी























