Drinking Milk With Jaggery : गूळ आणि दूध हे पदार्थ शरीरासाठी किती फायदेशीर आहेत, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. गूळ शरीराची पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो, तर दूध शरिरातील कॅल्शिअम वाढवते. मात्र दूध आणि गूळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत. दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवणे, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर करणे, असे अनेक फायदे होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
दूध आणि गूळ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. हे पचन, रक्त शुध्दीकरण आणि मासिक पाळीच्या समस्यांमध्येही मदत करते. गुळाच्या दुधात महत्त्वपूर्ण प्रमाणात लोह असते, ज्यामुळे एकूण हिमोग्लोबिनची पातळी वाढते. परिणामी ते अशक्तपणा टाळण्यास मदत करते आणि गर्भवती महिलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. यामध्ये सुक्रोज आहे, जो उर्जा वाढवते आणि शरीरातील थकवा आणि अशक्तपणा टाळतो.
काय आहेत दूधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे?
दुधात गूळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात.
पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो.
मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
गुडघेदुखीच्या त्रासासाठीही याचा फायदा होतो.
गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
गुळयुक्त दूध पिणे त्वचा आणि केस तसेच हाडांसाठी उत्कृष्ट आहे. रात्री झोपण्याआधी गूळ दूध घेतल्यास तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. जेणेकरून आपल्याला रात्रीची झोप चांगली मिळेल आणि पुन्हा सकाळी ताजंतवान वाटेल. एकंदरीत आधी म्हटल्याप्रमाणे गूळ आणि दुधाचे असंख्य फायदे आहेत आणि भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील आशियाई देशांमध्ये गुळ विशेष लोकप्रिय आहे.दूध हे एक पौष्टिक पेय आहे. ज्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे अ आणि बी, प्रथिने आणि इतर अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Health Care Tips : सर्दीसोबतच कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करायचाय? मग, आहारात ‘हे’ सुपरफूड नक्की सामील करा!
- CoWin Portal News : कोविन पोर्टलवरून डेटा लीक? आरोग्य मंत्रालयाकडून महत्वाची माहिती... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..
- Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर बदला 'या' गोष्टी, पुन्हा संसर्ग होण्यापासून होईल बचाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha