Eknath Shinde : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आरोपाला नागरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनात शिंदे यांनी उत्तर दिले आहे. "सुशांत सिंग राजपूत ही आऊटडेटेड केस आहे. सीबीआयने चौकशी केली आहे. त्यात काही वेगळे निघाले नाही. शिवसेना कोणत्याही धमकीला आणि कारवाईला घाबरत नाही, घाबरली नाही आणि घाबरणार पण नाही. असे खूप अनुभव शिवसेनेच्या गाठीशी आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. 

Continues below advertisement


अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून ती हत्या आहे. त्याची फाईल परत ओपन करणार असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शुशांतच्या केसमध्ये सीबीआय आणि ईडीने चौकशी केली आहे. यात आणखी काही काढायचे असेल तर माहीत नाही. आता सुबोध जैस्वाल हे सीबीआय प्रमुख आहेत, राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी जैस्वाल यांना विचारावे, हा विषय त्यांच्या खात्याकडे आहे. पत्रकार परिषदेत शंका-कुशंका निर्माण करू नये, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  


एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "श्रेय घेण्यासाठी आम्ही कधीही जात नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी असे आम्हाला शिकवले नाही. जे काम करतो ते ठोकून संगतो. क्लस्टरसाठी आम्ही सर्वांनी खूप संघर्ष केला आहे. विधानसभेत निलंबित झालो, अनेकांनी त्यासाठी मेहेनत घेतली, देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली. पण आमचा रेटा इतका होता की सरकारला मागणी मान्य करावी लागली. माझ्याकडे नगरविकास विभाग आला, त्यावेळी आम्ही त्यातील अनेक त्रुटी कमी केल्या. नाहीतर क्लस्टर कागदावरच राहिला असता, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 
 
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील छुप्या वादावरही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील आघाड्या होत आहेत, सर्वांनी समांजस्याने घ्यायला हवे. मी कोणत्या अॅक्शनला रिअॅक्शन देत नाही, मी काम करत असतो. कोणी पत्रकार परिषद  घेऊन आरोप केले तर त्याला उत्तर देणे भाग आहे. त्या आरोपांचे खंडन करणे गरजेचे आहे, त्यामुळे काही नेत्यांनी ते काम केले आहे, असे मत नागरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनात शिंदे यांनी व्यक्त केले आहे. 


महत्वाच्या बातम्या


मिशन ते कमिशन... जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांची एकमेकांवर टोलेबाजी


महाविकास आघाडीत कुणाची मनं दुखावणार नाहीत याचा विचार करुन बोलावं- एकनाथ शिंदे