Omicron Variant Alert : हिवाळा ऋतू (Winter) आणि कडाक्याची थंडी आपल्यासोबत अनेक प्रकारचे रोग घेऊन येते. या ऋतूमध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी (Health Care Tips) घेणे आवश्यक आहे. विशेषतः आता जेव्हा कोरोनाची लाट तीव्र आहे. अनेक लोकांना नवीन व्हेरियंट Omicronची लागण होत आहे. अशा परिस्थितीत असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून तसेच ओमायक्रॉनपासून संरक्षण देतील.


आहारातील हे पदार्थ शरीराचे तापमान वाढवून सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून तर आपले संरक्षण करतातच, पण त्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत केवळ उबदार कपडेच नाही, तर ‘हे’ सुपरफूड देखील तुमचे संरक्षण कवच ठरतील.


बदाम


हिवाळ्यात बदाम तुमच्या शरीराला उबदार ठेवतात. हे तुमची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यात आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. यासाठी बदाम आणि इतर नट्स जसे की, अक्रोड आणि जर्दाळू यांचे मिश्रण बनवून त्याचा स्नॅक्स म्हणूनही वापर करू शकता. याचे रोज सेवन केल्याने सर्दीपासून तसेच कोरोनापासूनही बचाव होतो.


मटार


हिवाळ्यात हिरव्या ताज्या मटारचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. मटार व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि बीटा कॅरोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये कोस्ट्रॉल असते, जे कोलन कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते.


डाळिंब


जरी प्रत्येक ऋतूत डाळिंब खाणे चांगले असले, तरी हिवाळ्यात ते तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेते. डाळिंबात सर्व प्रकारचे पोषक घटक आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. डाळिंबामध्ये तुमचे आयुष्य वाढवण्याची क्षमता देखील आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट हृदयरोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्याचे काम करतात. याशिवाय, ते हृदय, केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे.


फ्लॉवर


फ्लॉवर हिवाळ्यासाठी उत्तम भाजी आहे आणि त्यात व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतो. यासाठी तुम्ही तो उकडून, तळून किंवा त्याची भाजी अथवा सूप बनवून सेवन करू शकता. फ्लॉवर थंडीपासून तुमचे संरक्षण करण्यासोबतच तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha