Yoga Tips to Increase Height : योग मानसिक (Mental Health) आणि शारीरिक आरोग्याचा (Health Tips) समतोल राखण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. तणाव, वाढत्या वजनाची (Weight Gain) समस्या अशा अनक समस्यांवर तुम्ही योगासनं (Yoga) करुन आराम मिळवू शकता. इतकंच नाही तर अनेक जण त्यांच्या उंचीबाबत (Height) समाधानी नसतात. तुम्ही योगाचा (Yoga Tips) दैनंदिन जीवनात (Daily Life) समावेश करुन उंची वाढवू शकता. नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. नियमित योग केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.


नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी योगासनं फायदेशीर


मानवी शरीराची वाढ त्यातील गुणसूत्र आणि जनुकांच्या (Genes) आधारे होते. यामुळे अनेकांच्या शरीराची वाढ वेगवेगळ्या प्रकारे होते. काहींची उंची जास्त तर काहींची कमी असते. अनेक जण त्यांच्या उंचीवर असंतुष्ट असतात. आपली उंची वाढावी अशी काहींची इच्छा असते. यासाठी काही जण औषधांचीही मदत घेतात, पण याचा काही फायदा झालेला दिसत नाही. पण तुम्ही योगासनांच्या मदतीने नैसर्गिक प्रकारे तुमची उंची वाढवू शकता.


ताडासन


सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवा. दोन्ही हात जोडा आणि आपल्या छातीजवळ आणा. आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेऊन जा. हात सरळ ठेवा आणि ताणून घ्या. तुमच्या दोन्ही पायांची टाच उचला आणि पायाच्या बोटांवर उभे रहा. 10 सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि श्वास घेत रहा. आता श्वास सोडताना, तुमच्या सुरुवातीच्या मूळ स्थितीमध्ये जा आणि पुन्हा सरळ उभे राहा. हे योगासन 10 वेळा करा.


शीर्षासन


वज्रासनामध्ये म्हणजेच दोन्ही पाय मागच्या बाजूला दुमडून जमिनीवर बसा. तुमचे दोन्ही हात समोर ठेवून बोट एकमेकांमध्ये अडकून जमिनीवर ठेवा. बोटांमध्ये असलेल्या जागेमध्ये डोकं ठेवा. आता पाय उचलण्याचा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला पाय वर करता येणार नाही. पण तुम्ही थोडे लक्ष केंद्रित केले की, तुमचा पाय तुम्हाला वर नेता येईल. पाय सरळ वर घेऊन याच स्थितीत 30 सेकंद राहा. मानेची हालचाल करु नका, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता असते. (हे आसन करताना तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता)


वृक्षासन


जमिनीवर सरळ उभे राहा आणि हात शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा. उजवा गुडघा वाकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवा. तुमच्या पायाचा तळवा मांडीला स्पर्श करेल अशा स्थितीत ठेवा. यावेळी तुमचा डावा पाय सरळ ठेवा आणि शरीराचा समतोल राखा. या आसनात दीर्घ श्वास घेत राहा. आता तुमचे हात जोडा आणि ते डोक्याच्या बाजूला सरळ वर न्या. तुमचे संपूर्ण शरीर ताणलेले असावे आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. या आसनात 30 सेकंद राहा. श्वास सोडा आणि परत सामान्य स्थितीत या. हेच दुसऱ्या पायाने करा.


चक्रासन


जमिनीवर पाठीवर झोपून दीर्घ श्वास घ्या. दोन्ही गुडघे वाकवा आणि टाच आपल्या नितंबांच्या जवळ आणा. तुमचे तळवे आणि पाय यांचा वापर करुन शरीराला वर उचला. आपल्या खांद्याच्या समांतर रेषेत पाय ठेवा. हात आणि पायांवर वजन समान प्रमाणात वितरित करुन शरीर वरच्या बाजूला न्या. काही वेळ या स्थितीत राहा. त्यानंतर पुन्हा मूळ स्थितीत जमिनीवर खाली झोपा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pregnancy Tips : गर्भवती महिलांचा आहार कसा असावा? 'अशी' घ्या काळजी; वाचा सविस्तर