Pregnancy Healthy Diet : गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे (Health Tips) विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. यावेळी निष्काळजीपणा केल्यास आई (Mother) आणि मूल (Baby) दोघांच्याही आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी दररोज संतुलित आहार (Balanced Diet) घेणं गरजेचं आहे. संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यामुळे अनेक आजारांचा धोका टाळत निरोगी राहण्यासाठी मदत होते. गरोदर महिलांनी निरोगी राहण्यासाठी दररोज कोणता आहार घ्यावा हे जाणून घ्या.


गर्भवती महिलांचा आहार कसा असावा?



  • गर्भवती महिलांनी निरोगी राहणे खूप महत्वाचं आहे. यासाठी दिवसाची सुरुवात दुधाच्या सेवनाने करा. रोज सकाळी एक ग्लास दूध प्या. दुधात प्रथिने, कॅल्शियम कार्ब्स, हेल्दी फॅट्स आणि फायबर आढळतात.

  • शरीरात प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करा. अंड्यामध्ये प्रथिने तसेच व्हिटॅमिन-ए, बी12, बी2, बी5, फॉस्फरस, लोह, सेलेनियम देखील आढळतात. यामुळे पोषकत्त्वांनी युक्त अंडी दररोज नक्कीच खावीत.

  • गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश केला पाहिजे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, के, लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. हे पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

  • गरोदरपणात महिलांनी आहारात डाळींचा समावेश करावा. यामध्ये लोह, फायबर, फोलेट इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात. हे आवश्यक पोषक घटक महिलांसाठी फायदेशीर आहेत.

  • अनेक वेळी गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये लोहाची कमतरता दिसून येते. त्यामुळे अॅनिमियाचा धोका वाढतो. हा आजार टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी आहारात पालेभाज्या तसेच डाळी यांचा समावेश करावा. पालकमध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. याचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.

  • गर्भवती महिलांनी आहारात बीन्सचा समावेश करणं आवश्यक आहे. बीन्समध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन-बी आणि कॅल्शियम हे आवश्यक पोषक घटक आढळतात. यामुळे आरोग्यासंबंधित विविध समस्यांपासून संरक्षण होते.

  • गर्भाधारणेदरम्यान बाळाच्या शारीरिक विकासासाठी साल्मन माशाचे (Salmon Fish) सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही आहारात सीफूडचाही समावेश करु शकता. यामुळे शरीराला आवश्यक ओमेगा फॅटी-3 अॅसिड आढळते. हे आवश्यक पोषक मेंदू आणि डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


WHO confirms Marburg Disease Outbreak: चिंताजनक! कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू, 'मारबर्ग' व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू, WHO ने बोलावली महत्त्वाची बैठक