Yoga For Asthma : अस्थमा (Asthma) ज्याला ‘दमा’ असेही म्हणतात, हा एक असा आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसांना श्वास घेणे कठीण होते. दम्यामध्ये, रुग्णाच्या श्वसनलिकेवर सूज येते, ज्यामुळे वायुमार्ग संकुचित होतात. अशा स्थितीत श्वासोच्छ्वास श्वसनलिकेद्वारे फुफ्फुसाच्या आत आणि बाहेर जातो. जेव्हा, या भागामध्ये सूज वाढते तेव्हा श्वास घेणे कठीण होते. दम्याच्या रुग्णाला श्वास लागणे, खोकला, घरघर आणि छातीत जडपणा जाणवणे अशी लक्षणे दिसतात.


अनेक वेळा खोकल्यामुळे फुफ्फुसात कफ जमा होऊ लागतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अशा स्थितीत योगाच्या माध्यमातून तुम्ही श्वास घेण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. ‘ही’ 5 योगासने तुम्ही रोज करू शकता.


अर्ध मत्स्येंद्रासन : दम्याचे रुग्ण अर्ध मत्स्येंद्रासन हा योगा करू शकतात. त्यामुळे फुफ्फुसात ऑक्सिजन चांगल्याप्रकारे पोहोचतो आणि छाती मोकळी होते. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना खूप आराम मिळतो.


पवनमुक्तासन : हे योगासन पोटातील अवयवांना आराम देते आणि पचनसंस्था मजबूत करते. त्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते. अस्थमाच्या रुग्णांसाठी हे एक चांगले योगासन आहे.


सेतुबंधासन : हे सोपे योगासन दम्याच्या रुग्णांसाठी खूप चांगले आहे. त्यात तयार झालेली सेतू मुद्रा छाती आणि फुफ्फुसाचा मार्ग मोकळा करते. थायरॉईड आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी हे एक चांगले योगासन आहे. यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.


भुजंगासन : भुजंगासन दम्याच्या रुग्णांसाठी खूप चांगले आहे. या योगासनामुळे छातीतील श्वासोच्छवासाचा त्रास दूर होतो. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.


अधोमुख श्वानासन : सायनस आणि दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी अधोमुख श्वानासन हे उत्तम योगासन आहे. यामुळे मन शांत होते आणि तणाव दूर राहतो. हा योगा दमा रुग्णांसाठी फायदेशीर आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha