Pineapple For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी अधिकाधिक फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. मात्र, केवळ वजन कमी करणारी फळेच आहारात समाविष्ट केली पाहिजेत. अननस (Pineapple) हे एक असे फळ आहे, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. अननसमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात. यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. अननसाचे सेवन चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी अननसाचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडे देखील मजबूत होतात. चला तर, जाणून घेऊया अननसाचे इतर अनेक फायदे...


अननस खाण्याचे फायदे :


* अननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात. ते खाल्ल्याने वजन कमी होते.


* अननसात उच्च प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.


* अननस खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते.


* अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो, ज्याद्वारे वजन नियंत्रित ठेवता येते.


* अननसाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.


* यामध्ये मँगनीज आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.


* अननसमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे दमा आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.


* अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही.


* अननसाचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका टाळता येतो.


* अननस खाल्ल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha