World Post Day 2023 : दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिन (World Post Day) साजरा केला जातो. हा दिवस 1969 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी बहुसंख्य लोक पत्रांचा वापर संवाद साधण्यासाठी करत असत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी पत्रांचा खूप उपयोग झाला आणि या देवाण घेवाणीत टपाल खात्याचा सर्वात मोठा वाटा होता. टपाल सेवा खेड्यांपासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत विकसित झाली आहे. सध्या सोशल मीडियाचं युग असलं तरी मात्र, पत्रव्यवहार अजूनही सुरु आहेत. कालांतराने त्यात पत्र व्यवहार वितरित करण्या व्यतिरिक्त टपाल विभाग अजूनही पेमेंट, मनी ट्रान्सफर आणि बचत इत्यादींमध्ये आपली उपयुक्तता कायम ठेवतो.
बदलत्या वातावरणात, युनिव्हर्सल पोस्टल युनियनतर्फे आज साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक पोस्ट दिनाचा इतिहास आणि टपाल विभागाचं महत्त्व नेमकं काय आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
जागतिक पोस्ट दिनाचा इतिहास (World Post Day History)
स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो. मात्र हा दिवस जागतिक टपाल दिन (World Post Day) म्हणून घोषित होण्यास बराच कालावधी लागला. 1969 मध्ये टोकियो, जपान येथे झालेल्या पोस्टल युनियन काँग्रेसने हा दिवस जागतिक पोस्ट दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर जगभरातील देश हा दिवस साजरा करतात.
जागतिक पोस्ट दिनाचे महत्त्व (World Post Day Importance)
जागतिक टपाल दिनाच्या माध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात. हा दिवस प्रामुख्याने टपाल सेवांच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो. देशाच्या विकास सेवेचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व वाढवणं हे जागतिक पोस्ट दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
जागतिक पोस्ट दिनाची थीम (World Post Day Theme)
दरवर्षी जागतिक पोस्ट दिन साजरा करण्यासाठी एक थीम सेट केली जाते. त्यानुसार, 'विश्वासासाठी एकत्र: सुरक्षित आणि कनेक्टेड भविष्यासाठी सहकार्य करणे' (‘Together for Trust: Collaborating for a safe and connected future’) अशी यावर्षीची थीम आहे.
महत्त्वाच्या बातम्या :