Heath Tips : आजकाल लोक आपला बराचसा वेळ स्क्रीनसमोर घालवतात. अशा परिस्थितीत सतत स्क्रीनच्या संपर्कात राहिल्याने डोळ्यांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. ड्राय आय सिंड्रोम ही यातील एक समस्या आहे. यामध्ये आपल्या डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाही. अश्रू हे प्रामुख्याने तेल, पाणी आणि म्युकस यापासून बनलेले असते. डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी डोळ्यात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते. कारण त्यामुळे डोळ्यात आलेली धूळ, कचरा अश्रूवाटे निघून जाण्यास मदत होते. तसेच अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात व डोळ्यांतील ओलावाही टिकवून ठेवतात. मात्र डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन डोळे कोरडे पडल्यास डोळ्याच्या अनेक तक्रारीही निर्माण होतात. अशा परिस्थितीत ड्राय आय सिंड्रोम टाळण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
ह्युमिडिफायर वापरा
ह्युमिडिफायर कोरड्या स्थितीत हवेला आर्द्रता पुरवतो, विशेषत: हिवाळ्यात किंवा वातानुकूलित जागेत, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना कोरडेपणापासून संरक्षण मिळते.
तुमची स्क्रीन संगणकापासून योग्य अंतरावर ठेवा
जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वगैरे वापरत असाल तर लक्षात ठेवा की, तुमच्या कॉम्प्युटरची स्क्रीन तुमच्या डोळ्यांपासून आणि डोळ्यांच्या पातळीवर 20 इंच असावी. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि आरामात दिसण्यास मदत होते
निरोगी आहाराचे पालन करा
निरोगी राहण्यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. डोळ्यांसाठी, विशेषतः गाजर आणि रताळे यांसारखे व्हिटॅमिन ए समृद्ध असलेले अन्नपदार्थ खावेत. याशिवाय ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेले पदार्थ जसे की, मासे देखील फायदेशीर ठरतील. हे पोषक कोरडे डोळे टाळण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
नियमितपणे पापण्यांची उघडझाप करत राहा
जेव्हा तुम्ही कोणतीही डिजिटल वस्तू वापरत असाल तेव्हा वारंवार डोळ्यांची उघडझाप करा. असे केल्याने, डोळ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो.
आपल्या डोळ्यांची काळजी घ्या
अनेकदा वारा आणि सूर्यप्रकाशामुळे डोळे कोरडे होऊ लागतात. अशा परिस्थितीत डोळ्यांना वारा आणि सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी सनग्लासेस वापरा. असे केल्याने तुम्ही कोरडे डोळे टाळू शकता.
20-20-20 नियम पाळा
संगणक किंवा इतर कोणतेही डिजिटल वस्तू वापरत असताना, दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहा. त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि कोरडेपणा येत नाही.
हायड्रेटेड रहा
दिवसभर पुरेशा प्रमाणात हायड्रेटेड राहिल्याने तुमचे डोळे निरोगी राहतात आणि कोरडेपणा टाळण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : सर्दी आणि घसादुखीचा खूप त्रास होतोय? वेळीच वाफ घ्या अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय