मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, काल (मंगळवारी) 89 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या1 हजार 593 वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या 719 इतकी झाली आहे. राज्यामध्ये मंगळवारी सापडलेल्या 89 रुग्णांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील 32, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील 23, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील 9, कल्याण महानगरपालिका व छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी 4, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि सातारा येथील प्रत्येकी 3, चंद्रपूर 2, नवी मुंबई, मीरा भाईंदर, रायगड, पुणे, सांगली आणि गोंदियामध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

Continues below advertisement


राज्यात जानेवारी 2025 पासून एकूण 18 हजार 103 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी1 हजार 593 जण बाधित आढळले आहेत. आतापर्यंत 959 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 615 रुग्ण सक्रिय आहेत. सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. राज्यात कोरोनाच्या 89 नव्या रुग्णांची नोंद काल मंगळवारी झाली आहे. सध्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 593 वर पोहोचली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 719 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 60.20% टक्के इतका आहे.


महाराष्ट्रात 89 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू


मुंबई-32
पुणे महानगरपालिका-23
ठाणे महानगरपालिका-3
नवी मुंबई महानगरपालिका-01
कल्याण महानगरपालिका-04
मीरा भाईंदर महानगरपालिका-01
रायगड-01
पुणे-01
पीसीएमसी-09
सातारा-03
सांगली-01
छ. संभाजीनगर महानगरपालिका-04
गोंदिया-01
चंद्रपूर-02
नागपूर महानगरपालिका - 03


जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण रुग्णांची संख्या 719 इतकी आहे. जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचण्यांची संख्या ही 18103 इतकी आहे. जानेवारी 2025 पासून 1593 पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत 959 रुग्ण बरे झाले आहेत.


नागरिकांनी सतर्कता बाळगावी


 नागरिकांनी खबरदारी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना आजार आहेत, त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्कता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागकडून करण्यात आले आहे.