World Kidney Day 2022 : किडनीचा आजार अतिशय धोकादायक मानला जातो. अशा परिस्थितीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. किडनीचा आजार होण्याची खरंतर अनेक कारणे आहेत. पण रोजच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास किडनीचा धोका टाळता येऊ शकतो. यासाठी आज जागतिक किडनी दिनानिमित्त आम्ही तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही केल्यास या आजारापासून तुम्ही लांब राहू शकता. या टिप्स कोणत्या ते जाणून घ्या.   


हेल्दी किडनीसाठी काही टिप्स तुमच्यासाठी :


1. भरपूर पाणी प्या.   


दिवसातून आठ ग्लास पाणी म्हणजेच कमीत कमी दोन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण ते तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास प्रोत्साहित करते. नियमित, सातत्यपूर्ण पाणी पिणे तुमच्या किडनीसाठी आरोग्यदायी आहे. पाणी तुमच्या किडनीतून सोडियम आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे तुमचा क्रॉनिक किडनीच्या आजाराचा धोकाही कमी होतो. तुम्हाला किती पाण्याची गरज आहे हे तुमच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.


2. तुमच्या डाएटमध्ये समतोल राहू द्या 


तुम्ही जे काही खाता-पिता त्याचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो. योग्यरित्या डाएट न केल्यास त्याचे फॅट्स वाढतात. ज्या लोकांचं जास्त वजन आहे किंवा लठ्ठपणा आहे त्यांना अनेक आजारंचा धोका असतो ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते. यामध्ये मधुमेह, हृदयविकार आणि किडनी आजार यांचा समावेश आहे. निरोगी आहार किडनीचे नुकसान होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात. यासाठी फ्लॉवर, ब्लूबेरी, मासे, संपूर्ण धान्य आणि बरेच काही यासारखे नैसर्गिकरित्या कमी सोडियम असलेले ताजे पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित करा


3. चहा, कॉफी प्रमाणात प्या. 


चहा , कॉफी, सोडा या सगळ्या पेयांमध्ये कॅफेन असते. तसेच, चहा, कॉफी थोडा वेळ घेतल्यानंतर शरीरात ताजेपणा जाणवतो. पण यातील घटक किडनीवर परिणाम करतात. 


4. नियमित व्यायाम करा. 


नियमित व्यायाम केल्याने शरीरातील निम्मे प्रॉब्लेम कमी होतात. शरीराला सतत हालचालीची गरज असते. यासाठी संतुलित आहाराप्रमाणेच नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यास वजनही नियंत्रणात राहतं.   


5. तुमच्या बीपी आणि मधुमेहावर सतत लक्ष ठेवा. 


उच्च रक्तदाबामुळे किडनी खराब होऊ शकते. मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या इतर आरोग्य समस्यांसह उच्च रक्तदाब उद्भवल्यास, तुमच्या शरीरावर परिणाम लक्षणीय असू शकतो. जर तुमचा रक्तदाब रीडिंग सतत 140/90 च्या वर असेल, तर तुम्हाला उच्च रक्तदाब असू शकतो. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या रक्तदाबाचे नियमित निरीक्षण करणे, तुमच्या जीवनशैलीत बदल करणे याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 
 


6. अधिकाधिक गोळ्यांचा अॅलोपॅथिक गोळ्यांचा वापर टाळा 


तुम्ही नियमितपणे ओव्हर द काऊंटर वेदनाशामक औषधं घेत असाल तर तुम्हाला मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. मूत्रपिंडाचा समस्या नसलेले लोक अधूनमधून औषधं घेतात. तथापि, जर तुम्ही ही औषधे वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या मूत्रपिंडाचे आरोग्य धोक्यात आणत आहात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha