Amla benefits : आवळ्याचा (Amla) उपयोग फळ आणि भाजी या दोन्हीमध्ये केला जातो. फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त आवळा हे खूप प्रभावी औषध आहे. आयुर्वेदात, आवळ्याचा उपयोग अनेक सामान्य ते गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. वात, पित्त किंवा कफ या प्रकृतीचे आजार बरे करण्यासाठी आवळा पावडरचा वापर कसा करू शकता हे जाणून घ्या. 


वात प्रकृतीच्या रोगांसाठी - वात प्रकृतीचे रोग म्हणजे असे रोग ज्यांच्यामुळे शरीरात प्रामुख्याने वेदना होतात. जर तुम्हाला वाताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही दररोज पाच ग्रॅम आवळा पावडर तिळाच्या तेलात मिसळून त्याचे सेवन करू शकता. तुम्ही हे मिश्रण जेवणापूर्वी किंवा नंतर घेऊ शकता.


पित्तासारखा त्रास असलेल्या रोगांसाठी - शरीरात पित्तदोषाचे प्रमाण वाढले की पोट आणि पचनाचे आजार वाढतात. उदाहरणार्थ, आम्लपित्त, कमी पचन, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, आंबट ढेकर येणे इत्यादी आजारांमुळे शरीरात पित्त वाढते. या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच ग्रॅम आवळा पावडर तुपात मिसळून जेवणानंतर सेवन करा. 


कफचा त्रास असणाऱ्या रूग्णांसाठी : जेव्हा शरीरात कफचे प्रमाण वाढते तेव्हा शरीर नेहमी सुस्त राहते. तसेच झोप न लागणे किंवा आळस येण्याची समस्या उद्भवते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. नैराश्य येऊ शकते. या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी आवळा पावडर मधात मिसळून खा. जेवणापूर्वी किंवा नंतर तुम्ही याचे सेवन करू शकता.


आवळ्याचे फायदे :



  • आवळ्याची चव सुरुवातीला खूप आंबट असते, पण ती चघळल्यानंतर तोंडाला चव येते. 

  • आवळा शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्याचे काम करतो.

  • आवळा शरीरात थंडपणा वाढवतो आणि उष्णतेचा प्रभाव शांत करतो.

  • आवळा हे पोटाचे आजार तसेच त्वचेचे आजार बरे करण्यासाठी अतिशय प्रभावी औषध आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha