Sanjay Raut : गोव्यात (Goa and Uttar Pradesh Election)जे गेल्या वेळी झालं ते यावेळी होणार नाही. गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही. राज्याबाहेर आम्ही पक्ष नेण्याचा प्रयत्न करतोय. संघर्ष आम्ही करतोय, लोकसभेची निवडणुक सुद्धा आम्ही इतर राज्यांमध्ये लढवू असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश व गोवा निवडणुकांसंदर्भात केले आहे.

  


शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर 'फ्लॉप शो' वर राऊतांची प्रतिक्रिया


खिचडी बहोत जगह बन सकती है. मतमोजणी पूर्ण झाली अजून, लोकांना नोटाला का मतं द्यावीशी वाटतायत हा प्रश्न सर्वच राजकीय लोकांनी करण्याची गरज आहे. आम्ही पूर्ण काम केलं होतं. उत्तर प्रदेश, गोव्यात आम्ही प्रयत्न केलेत. आदित्य जी देखील आले होते प्रचाराला. ही सुरुवात आहे. आधी धडपड करावी लागते आणि ती आम्ही केली. आता आम्ही थांबणार नाही. आता लोकसभा लढू. सुरुवात केली आहे. प्रमोद सावंत यांच्याविषयी नाराजी होती. आम्ही आदित्य ठाकरेंची सभा देखील तिकडे घेतली होती. मात्र, आता अजून चित्र स्पष्ट व्हायला २ वाजतील. बघू काय होते. गोव्यात मागील सारखी परिस्थिती नाही ओढवणार, चिदंबरमांचा मला फोन आलेला. माझं बोलणं झालं. ते गोव्यात आहेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करु. असे राऊत यावेळी म्हणाले

महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेचा पहिल्या दीड तासाच्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभाही घेतली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. दरम्यान,  महाराष्ट्राबाहेर पक्ष विस्तार करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. असे संजय राऊत म्हणाले.  त्यादृष्टीने शिवसेनेने गोव्यात आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने काँग्रेससोबत युती करण्यासाठी बोलणीदेखील केली होती. मात्र, काँग्रेसने नकार दिल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. तर, उत्तर प्रदेशात शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. गोव्यात शिवसेनेने 10 उमेदवार उभे केले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने 13 उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे.


दुपारी २ वाजेपर्यंत थांबा, चित्र स्पष्ट होईल


उत्तरप्रदेशात योगी पुढे जाणार हे नक्की होतं पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी आहे. आम्ही पूर्ण काम केलं होतं. दुपारी २ वाजेपर्यंत थांबा, चित्र स्पष्ट होईल. गोवा, युपीबाबत काही सांगता येणार नाही. सध्या पोस्टल मतमोजणी झाली, अद्याप इतर मतमोजणी बाकी आहे आताच कुठे मतमोजणीला सुरवात झालीय. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात ५ वाजेपर्यंत स्पष्ट चित्र कळेल. असे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 


सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. शिवसेनेला 0.25 टक्के मतदान होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 0.83 टक्के मिळाली. तर, नोटा पर्यायाला 1.20 टक्के मतदान मिळाले. उत्तर प्रदेशमध्येही शिवसेनेच्या उमेदवारांची सुमार कामगिरी राहिली. शिवसेनेच्या उमेदवारांना 0.02 टक्के मते मिळाली. तर, नोटा पर्यायाला 0.71 टक्के मते मिळाली.  


प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात 


शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सभा घेतल्या. राज्याबाहेर शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभा घेणारे आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...