World Food Day 2022 : आज जागतिक अन्न दिन (World Food Day). या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक अन्न दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जागतिक भुकेचा सामना करणे आणि संपूर्ण जगातून ती दूर करणे हा आहे. जेणेकरून कोणीही उपाशी आणि कुपोषित राहणार नाही. कुपोषणामुळे दरवर्षी लाखो-करोडो लोकांचा जीव जातो, अशा परिस्थितीत जागतिक अन्न दिनानिमित्त लोकांना जागरुक करणे हे यामागचा हेतू आहे.


जागतिक अन्न दिनाची सुरुवात कधी झाली?


अन्न आणि कृषी संघटना (FAO) द्वारे 1945 मध्ये रोममध्ये सर्वात आधी जागतिक अन्न दिनाची स्थापना करण्यात आली. जगभरातील संयुक्त राष्ट्रांचे 150 सदस्य देश एकत्रितपणे जागतिक अन्न दिन साजरा करतात. या दिवशी ठिकठिकाणी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम राबविले जातात. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना साधा अन्नाचा कणही मिळत नाही. योग्य आहाराअभावी त्यांना अनेक प्रकारे कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.


'या' गोष्टी लक्षात ठेवा



  • प्रथिने, चरबी, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे संतुलित प्रमाणात आहारात घ्या.

  • गर्भवती महिलांनी लोहयुक्त पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्यामध्ये लोह, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, आयोडीन आणि व्हिटॅमिन ए असते. त्यांनी गुळासोबत दूध प्यावे, हिरव्या भाज्या व फळे खावीत.

  • तुमच्या आहारात बाजरीचा समावेश करा. बाजरीत भरपूर पोषण असते.

  • तुमच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा नियमित समावेश करा. शरीराच्या विकासासाठी ते खूप महत्वाचे आहे.

  • मसूरमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. आपल्या आहारात मसूराचा समावेश जरूर करा. ते आपल्याला रोगापासून वाचविण्यात मदत करतात.

  • तुमच्या आहारात सुक्या फळांचाही समावेश करा. ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात.

  • आहारात दूध, दही, चीज, तूप, ताक यांचा समावेश नक्की करा. यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन-डी आणि इतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही.

  • अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आणि प्रथिने नैसर्गिकरित्या आढळतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


World Spine Day 2022 : वाढत्या वयात पाठदुखीची समस्या जाणवतेय? 'या' घरगुती उपायांनी आराम मिळवा