Akshaya-Hardeek Video Viral : 'तुझ्यात जीव रंगला' फेम मराठमोळा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधरचा (Akshaya Deodhar) नुकताच साखरपुडा पार पडला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेक. अक्षया लग्नात नेसणार असलेली साडी विणण्याच्या कार्यक्रम नुकताच पार पडला. दरम्यान या साडीतील काही धागे हार्दिकने स्वत:च्या हातांनी विणले आहेत. 


अक्षया-हार्दिकच्या लगीनघाईला आता सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयाची बॅचलर पार्टी झाली. आता अक्षया लग्नात नेसणार असलेल्या साडीच्या विणकामाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला. अक्षया-हार्दिकआधी अनेक कलाकारांनी साडी विणकामाचा कार्यक्रम केला आहे. 


अक्षया-हार्दिकच्या साडी विणकामाच्या कार्यक्रमाला दोघेंचे जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होते. दरम्यान अक्षया लग्नात नेसणार असलेल्या साडीतील काही धागे हार्दिकने स्वत:च्या हातांनी विणले. या कार्यक्रमादरम्यान अमोल नाईक, ऋचा आपटे आणि वीणा जगतापदेखील उपस्थित होते. 


वीणा जगतापने सोशल मीडियावर अक्षयाच्या साडीती धागे विणतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"अक्षू आणि हार्दिक तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. कालचा कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला आणि मुख्य म्हणजे नवीन काही तरी केलं आपण आणि हा प्रकार खूप आवडला. काल अक्षूच्या लग्नाची साडी विणायला घेतली तर आम्ही सगळ्यांनी दोन - दोन धागे विणले आणि वेगळंच समाधान मिळालं. मज्जा आली. नवीन आठवणी तयार झाल्या". 






संबंधित बातम्या


Akshaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार


Celebrity Diary : वरण-भात, तूप अन् लोणंचं; 'असा' आहे रांगड्या राणादाचा रोजचा खुराक