Bigg Boss 16 : टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरुवातीपासूनच खूप चर्चेत आहे. शोच्या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच नवे धमाके पाहायला मिळत आहेत. यातच शनिवारी प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मनोरंजनाचा डबल डोस पाहायला मिळाला. एकीकडे सलमान खानने शालीन भानोतची जोरदार शाळा घेतली, तर दुसरीकडे या सीझनमधून घरातून बाहेर पडलेल्या पहिल्या सदस्याचे नावही जाहीर करण्यात आले. स्पर्धक-अभिनेत्री श्रीजिता (Sreejita De) ‘बिग बॉस 16’च्या घरातून बाहेर गेली आहे.
नेहमीप्रमाणेच यावेळेसही वीकेंडच्या एपिसोडमध्ये अनेक धमाके आणि गोंधळ पाहायला मिळाला. सलमान खानने गेल्या आठवड्यात घरातील सततच्या उद्धटपणामुळे चर्चेत असलेल्या शालीनला चांगलेच फटकारले, तर शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत यांनीही कुटुंबातील सदस्यांसह खूप धमाल केली. या एपिसोडच्या शेवटी एलिमिनेट झालेल्या सदस्याचे नाव जाहीर करण्यात आले, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
पाच स्पर्धक झाले होते नॉमिनेट
‘बिग बॉस 16’च्या घरात गेल्या आठवड्यात अनेकांना नॉमिनेट करण्यात आले होते. गोरी नागोरी, एमसी स्टेन, शालिन भानोत, टीना दत्ता आणि श्रीजिता डे यांच्यासह अनेकांना गेल्या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आले होते. यापूर्वी अनेक टास्क झाले, ज्यात या पाच जणांना नॉमिनेट करण्यात आले. यावेळी गोरी नागोरी आणि श्रीजिता यांच्यात चांगलीच कॅट फाईट पाहायला मिळाली. शालीनला ‘बिग बॉस’मध्ये नॉमिनेट केले गेले ते त्याच्या कृत्यांमुळे, तर टीना, श्रीजिता, एमसी स्टॅन आणि गोरी यांना घरातील हंगाम्यामुळे गौतमने नॉमिनेट केले. याचवेळी सलमान खानने बिग बॉसच्या पहिल्या एलिमिनेशनची घोषणा केली.
श्रीजिताच्या बाहेर जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का
'बिग बॉस 16' च्या कालच्या एपिसोडमध्ये म्हणजेच ‘शनिवार वीकेंड के वार’मध्ये सलमान खानने एलीमिनेट सदस्याचे नाव जाहीर केले. यावेळी त्याने श्रीजिता डेचे नाव घेतले. ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक असलेल्या श्रीजिता डेचे नाव जेव्हा सलमानने इव्हिक्शनसाठी घेतले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, यापूर्वी गोरीसोबत झालेल्या भांडणामुळे श्रीजिता डेला प्रेक्षकांची कमी मते मिळाली होती आणि त्यामुळेच ती बेघर झाली आहे. यानंतर सलमानने तिला शुभेच्छा देऊन या घरातून निरोप दिला.
वाईल्ड कार्ड म्हणून पुन्हा एन्ट्री घेणार?
‘बिग बॉस’च्या घरातील श्रीजिता डेचा प्रवास संपला आहे. या एलिमिनेशनमुळे प्रेक्षकही थोडे निराश झाले आहेत आणि स्वत: श्रीजिता देखील या एलिमिनेशनशी सहमत नाही. ‘बिग बॉस 16’मध्ये तिला आणखी एक संधी दिली जाईल, असा विश्वास श्रीजिताला आहे. श्रीजिताने सांगितले की, तिला बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बोलावले जाऊ शकते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: