वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने यावर्षी जागतिक एड्स दिनानिमित्त एक स्पेशल थीम ठेवली असून तिचं नाम 'कम्युनिटी मेक द डिफरेंस' ठेवण्यात आलं आहे. हा गंभीर आजारावर योग्य उपचार शोधण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वैज्ञानिक रिसर्च करत आहेत. एका वैज्ञानिकाने दावा केला आहे की, एका इंफ्यूजन नावाच्या पद्धतीने एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान, याआधीही एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक नव्या पद्धती वापरण्यात आल्या आहेत. परंतु, यामुळे काही खास फायदा झाला नाही. अशातच इंफ्यूजन नावाची ही पद्धत एड्सग्रस्त लोकांसाठी एक नवी उमेद आहे. संपूर्ण जगभरात जवळपास चार कोटी लोक एड्ससारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. तर फक्त भारतातच हा आकडा 20 ते 25 लाख इतका आहे. सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, जगभरात 80 लाख लोकांना हे माहीतच नाही की, त्यांना एड्स आहे.
भारतात लोक समाजाच्या भितीने या आजाराबाबत कोणालाही सांगत नाहीत आणि त्यावर उपचारही घेत नाहीत. परिणामी त्यांच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर समाजही एचआयव्ही ग्रस्त लोकांना व्यवस्थित वागणूक देत नाही. त्यामुळे लोक या आजाराबाबत काहीही बोलताना घाबरतात.
एड्सचा संसर्ग अनेक कारणांमुळे होतो. जसं, संक्रमित रक्त, संक्रमित सुई किंवा सिरींज, असुरक्षित यौन संबंध. या मुख्य कारणांमुळे एड्स पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे याआजारापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय करण्याची गरज आहे. अनेक एनजीओ आणि संस्था एड्सबाबत जनजागृती करण्याचं काम करत आहेत. याच कारणामुळे एड्समुळे होणारा मृत्यूदर घटला आहे.
टिप : सदर माहिती एका अहवालानुसार वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे
ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार
सावधान! त्वचेसाठी 'या' उत्पादनांचा वापर करणं ठरू शकतं घातक
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!