1. विधानसभाध्यक्षपदासाठी खुल्या मतदानाच्या प्रस्तावाची शक्यता, सत्ताधाऱ्यारंकडून नाना पटोले तर भाजपचे किसन कथोरे मैदानात, सकाळी 11 वाजता निवडणूक

  2. मंत्र्यांचा शपथविधी आणि हंगामी अध्यक्ष बदलल्याने देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, शाहू, फुले, आंबेडकर यांची असूया का? महाविकास आघाडीचा भाजपला सवाल

  3. भाजप गोंधळ घालण्यासाठी योग्य पक्ष, असा गोंधळ नवे आमदार चालू देणार नाहीत, विधानसभेतील गोंधळावर रोहित पवारांची टीका

  4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्थगितीनंतरही आरे वसाहतीत कारशेडचं काम सुरुच, कारशेडसाठीच्या पर्यायी जागांवर वाद होण्याची शक्यता

  5. येत्या चार वर्षात मुंबई-दिल्ली मार्गावर दोनशेहून अधिक गाड्या वाढणार, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती




  1. पीकविमा हप्ता भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत, प्रधानमंत्री पीकविमा योजना रब्बी हंगामात राबविण्यासाठी मान्यता, शेतकऱ्यांना दिलासा

  2. महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानीच्या तिजोरीवर डल्ला, माणिक, दागिने आणि पुरातन नाणी गायब, चौकशी समितीच्या पाहणीनंतर वास्तव उजेडात

  3. हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, देशभरात संतापाची लाट, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तरुणीची मुस्कटदाबी

  4. पुण्यात 34 व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा उत्साह, 20 हजारांहून अधिक धावपटूंचा समावेश

  5. डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानला झोडपले, त्रिशतकी खेळीसह डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडीत, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तीन बाद 589 धावांवर घोषित