लंडन : रात्रपाळी (नाईट शिफ्ट) मध्ये काम करणे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरु शकतं. कारण एका नव्या संशोधनानुसार,रात्रपाळीमुळे तुम्ही वेळेवर जेवण करु शकत नाही. ज्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या यकृतावर होऊ शकतो.


संशोधकांनी यासंदर्भात उंदरांच्या पाचन क्षमतेचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना दिवसाच्या तुलनेत रात्री यकृताचा आकार वाढत असल्याचं दिसून आलं. यकृताचा आकार वाढताना त्याची ग्रहण करण्याची क्षमता वाढते, असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या अध्ययना दरम्यान, उंदारांना रात्रीच्या वेळेस चारा दिला. तर दिवसाच्या वेळेत, त्यांना आराम करु दिला.

सेल नावाच्या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात तुमची दैनंदिन क्रियेची लय बिघडते, तेव्हा त्याचा परिणाम यकृतावर होत असल्याचं म्हणलं आहे.

जिनेव्हा विश्वविद्यालयाचे शोधप्रमुख फ्लोर सिंटूरल यांनी सांगितलं की, “रात्रीच्या वेळस यकृताचा आकार 40 टक्के वाढल्याचं दिसून आलं. तर दिवसा याचा आकार पूर्वीप्रमाणे असतो. जीवनपद्धती बदलल्यास त्याचा परिणाम शरिरातील कार्यप्रणालीवर होतो.’’

नोट :  या संशोधनाच्या दाव्यांची सत्यता एबीपी माझाने पडताळली नाही. तेव्हा यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.