मुंबई: रिलायन्स जिओनं आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवी ऑफर आणली आहे. ही ऑफर कंपनीने JioFi राउटरसाठी आणली आहे. या नव्या ऑफरमध्ये आता ग्राहक आपलं जुनं राउटर, डोंगल, किंवा डेटा कार्ड एक्सचेंज करुन जिओचं नवं 4G राउटर घेऊ शकतात.

जिओच्या कोणत्याही डिजिटल स्टोअर किंवा जिओ केअर स्टोअरमधून ग्राहक आपला जुनं राउटर, डोंगल, किंवा डेटा कार्ड बदलून नवं JioFi राउटर घेऊ शकतात.


या ऑफरमध्ये यूजर्सला JioFi राउटरसाठी 1999 रुपये द्यावे लागणार आहेत. यासोबतच 408 (309+99) रुपये एवढं बेसिक रिचार्ज करावं लागेल. यामध्ये जर तुम्ही जुनं राउटर, डोंगल एक्सचेंज केलं तर त्याऐवजी 2,010 रुपये किंमतीचा डेटा तुम्हाला मिळणार आहे.

यासोबतच कंपनीने दुसराही प्लान दिला आहे. ज्यामध्ये राउटरसाठी 1999 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच 408 (309+99) रुपये बेसिक रिचार्ज करावं लागणार आहे. यानंतर कंपनी यूजर्सला 1,005 रुपये किंमतीचा डेटा मोफत देणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला तुमचं राउटर किंवा डोंगल एक्सचेंज करण्याची गरज नाही.