World Contraception Day 2024 : अनेकदा महिला नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात, कारण हा एक अतिशय सोपा मार्ग मानला जातो. या गोळ्या पूर्णपणे सुरक्षित मानल्या जात असल्या तरी, जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. म्हणूनच, दरवर्षी 26 सप्टेंबरला जागतिक गर्भनिरोधक दिन 2024 साजरा केला जातो. या निमित्ताने, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेणे किती हानिकारक असू शकते हे सांगणार आहोत.


 


गर्भधारणा टाळण्यासाठी बाजारात अनेक मार्ग उपलब्ध


गर्भधारणा टाळण्यासाठी बाजारात अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कंडोमपासून गर्भनिरोधक गोळ्यांपर्यंत, गर्भधारणा टाळण्यात मदत करणाऱ्या अनेक प्रभावी पद्धती आहेत. याविषयी लोकांना अधिक जागरूक करण्यासाठी दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक गर्भनिरोधक दिन साजरा केला जातो. या दिवशी लोकांना कुटुंब नियोजन आणि महिलांच्या आरोग्याविषयी माहिती, तसेच जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक स्त्रिया तोंडी गर्भनिरोधक गोळ्या देखील वापरतात. परंतु डॉक्टरांचा सल्ला न घेता ते घेणे तुमच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. आज आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे तोटे याबद्दल जाणून घेणार आहोत. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आस्था दयाल यांनी याबाबत माहिती दिलीय.


 


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने मोठा धोका


डॉक्टर दयाळ सांगतात की, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने खूप धोका असू शकतो. या गोळ्यांमध्ये हार्मोन्स असतात, जे प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असणे आवश्यक नाही. त्यामुळे मळमळ, वजन वाढणे, मूड बदलणे, अनियमित रक्तस्त्राव यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काही महिलांमध्ये या गोळ्यांमुळे रक्त गोठणे, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो. विशेषतः जर ती धूम्रपान करत असेल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल.


 


गर्भनिरोधक गोळ्यांचे इतर दुष्परिणाम


मासिक पाळीत बदल - यामुळे, मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे रक्तस्त्राव कमी होऊ शकतो, अनियमित होऊ शकतो किंवा पूर्णपणे थांबू शकतो.
स्तनांमध्ये ढिलेपणा- या गोळ्या घेण्याचा एक सामान्य तोटा म्हणजे स्तनांमध्ये ढिलेपणा
डोकेदुखी- काही महिलांना या गोळ्या घेतल्यानंतर डोकेदुखी होऊ शकते.
डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) - या स्थितीत नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते.
DVT मुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात, जसे की पल्मोनरी एम्बोलिझम (PE), जे फुफ्फुसातील रक्ताच्या अडथळ्यामुळे होते.


भविष्यात गर्भधारणेमध्ये समस्या येऊ शकतात



  • तुम्ही कोणतीही औषधे घेतल्यास, गर्भनिरोधक गोळ्या त्यांच्याशी प्रतिक्रिया देतील आणि त्यांची परिणामकारकता कमी करण्याची शक्यता आहे.

  • यामुळे अनेक नकारात्मक परिणाम देखील दिसू शकतात. 

  • एवढेच नाही तर गर्भनिरोधक गोळ्यांचा डोस योग्य नसल्यास हार्मोनल संतुलन बिघडू शकते, 

  • म्हणून, आपल्या वैद्यकीय इतिहासाबद्दल आणि गरजांबद्दल नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, 

  • जेणेकरून आपल्या आरोग्यास कोणतीही हानी होणार नाही.



हेही वाचा>>>


Women Health: महिलाचं 'हेच' ते योग्य वय, ज्यानंतर मासिक पाळी थांबते! गर्भधारणेची शक्यताही कमी होते, जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )