Women Health : मासिक पाळी (Menstruation) हा असा एक विषय आहे, ज्याबद्दल आजही अनेक स्त्रिया स्पष्टपणे बोलतात, किंबहुना आपल्या समाजात अजूनही काही ठिकाणी मासिक पाळीला अस्पृश्य मानले जाते. मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मुली आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळी दर महिन्याला ठरलेल्या वेळी येते. मुलींमध्ये 12 ते 13 वर्षांच्या दरम्यान मासिक पाळी सुरू होते आणि ठराविक वयानंतर थांबते ज्याला मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती म्हणतात. जाणून घेऊया मेनोपॉज म्हणजे काय? नेमक्या कोणत्या वयानंतर मुली आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळी थांबते? 



मेनोपॉज म्हणजे काय?


मेनोपॉज ही एक सामान्य प्रक्रिया आहे, जी एका विशिष्ट वयानंतर स्त्रियांमध्ये होते. एक अशी वेळ येते, जेव्हा स्त्रियांमध्ये मासिक पाळी थांबते, त्यानंतर त्यांची गर्भधारणेची शक्यता कमी होते, ज्याला रजोनिवृत्ती म्हणतात.


 


मेनोपॉजची लक्षणं काय आहेत?



  • मेनोपॉजची समस्या येण्यास बराच वेळ लागतो, 

  • या काळात अनेक महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात

  • त्यांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. 

  • रजोनिवृत्ती दरम्यान, रात्री घाम येणे, मूड बदलणे, चिडचिड, 

  • तणाव, गरमी, वारंवार लघवी होणे, झोपेत व्यत्यय, 

  • त्वचेवर कोरडेपणा आणि वजन वाढते.



मासिक पाळी थांबण्यासाठी योग्य वय कोणते?


स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती 42 वर्षांच्या वयानंतर सुरू होते, परंतु 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान मासिक पाळी थांबते. रजोनिवृत्तीपूर्वी, मासिक पाळी कमी होते आणि काही काळानंतर ती पूर्णपणे थांबते.


 


हेही वाचा>>>


Women Health : मासिक पाळी दरम्यान पूजा करावी की नाही? प्रेमानंद महाराजांनी दिले आश्चर्यकारक उत्तर, तर जया किशोरी म्हणतात..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )