Travel : भारतीय रेल्वेचा प्रवास (Indian Railway) हा सामान्य माणसापासून ते सर्व प्रकारच्या वर्गाच्या लोकांसाठी सुखकर आणि आरामदायी समजला जातो. हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे लाखो लोक दररोज एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करतात. लाखो पुरुष, मुलं आणि महिला देखील दररोज ट्रेनमधून प्रवास करतात. अनेकवेळा असे घडते की, अचानक किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे रेल्वेने प्रवास करावा लागतो, त्यावेळी तिकीट नसते. अनेक वेळेस असे घडते की, ट्रेनमध्ये प्रवास करत असल्यास तिकीट नसताना टीटीई प्रवाशांना खाली उतरवायला लावतात, पण आता असं होणार नाही. एखादी महिला तिकिट नसतानाही ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तर टीटीई तिला खाली उतरण्यास सांगू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वे कायद्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती घेतल्यानंतर TTE महिलेला ट्रेनमधून उतरवण्याऐवजी तिला सुरक्षा देतील. जाणून घ्या...
भारतीय रेल्वे कायदा 1989 काय सांगतो?
भारतीय रेल्वे कायदा 1989 ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना विशेष अधिकार देतो.
भारतीय रेल्वे कायदा 1989 चे कलम 139 महिलांच्या अधिकारांबद्दल बोलतो.
भारतीय रेल्वे कायदा 1989 च्या कलम 139 नुसार, जर एकट्याने प्रवास करत असलेली महिला
तसेच लहान मूल घेऊन रात्रीच्या वेळी तिकिटाविना महिला ट्रेनमधून प्रवास करत असेल,
तर TTE त्यांना या नियमानुसार खाली उतरवू शकत नाही.
मध्यरात्री टीटीईने एखाद्या महिलेला ट्रेनमधून उतरवल्यास,
ती महिला संबंधित महिला रेल्वे अधिकाऱ्याकडे टीटीईविरुद्ध गुन्हा दाखल करू शकते.
महिलेला कोणत्याही ठिकाणी उतरवू शकत नाही, तर...
जर महिलेकडे तिकीट नसेल आणि प्रवास करत असेल तर TTE त्या महिलेला कोणत्याही ठिकाणी उतरवू शकत नाही. ज्या भागात ट्रेन धावत आहे, त्या ठिकाणच्या जिल्हा मुख्यालयाच्या स्थानकावरच टीटीईला सोडता येईल. जिल्हा मुख्यालयाच्या रेल्वे स्थानकावर महिलेला उतरवण्यापूर्वी टीटीईने रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी लागते आणि त्यानंतर महिलेला त्या स्थानकावरून दुसरी ट्रेन पकडता येते
तिकीटाशिवाय प्रवास केल्यास काय होईल?
अनेकदा असे दिसून येते की, घाई किंवा इतर कोणत्याही कारणामुळे महिला विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करतात. हे चुकीचे असले तरी, टीटीई महिला किंवा बालकांना आग्रह करू शकत नाही. जर एखादी महिला तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर, TTE दंडासह ट्रेनचे तिकीट जारी करू शकते, परंतु मध्यरात्री ट्रेनमधून उतरू शकत नाही. एखादेवेळेस TTE आपण ट्रेनमधून उतरण्याचा आग्रह धरू शकतो.
कन्फर्म तिकीट नसेल तर?
अनेकदा असे दिसून येते की, अनेक महिला प्रवास करतात ज्यांचे तिकीट कन्फर्म नसले तरी वेटिंग लिस्टमध्ये नाव असते. जर एखाद्या महिलेचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि ती ट्रेनमध्ये चढली असेल, तर TTE तिला उतरवू शकत नाही. तर एखादी महिला स्लीपर तिकिटावर एसी क्लासमध्ये प्रवास करत असल्यास, टीटीई स्लीपर क्लासमध्ये जाण्याचा आग्रह धरू शकतो. त्याचप्रमाणे, जर एखादी महिला 3AC वर्गाचे एसी तिकीट घेऊन दुसऱ्या वर्गात प्रवास करत असेल, तर तिला तिकीटानुसार संबंधित डब्ब्यात प्रवास करण्याची विनंती केली जाऊ शकते.
हेही वाचा>>>
Travel : 'माझी ट्रेन कॅन्सल झाली तर कसं समजेल रे भाऊ? तिकीटाचं रिफंड कसं मिळेल? 'अशी' मिळेल माहिती, जाणून घ्या...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )