Indian Railway Train Cancelled : भारतीय रेल्वेचा प्रवास हा अतिशय सुखकर प्रवास समजला जातो. भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानले जाते. विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या रेल्वे आरामदायी असतात. प्रवाशांना त्यांच्या सामानासह सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करता येतो. भारतात रेल्वेने प्रवास करणे केवळ स्वस्तच नाही तर प्रवाशांसाठी सोयीचे समजले जातो. त्यामुळे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात.
तुमच्याबाबतीतही असे होऊ नये, म्हणून...
ट्रेनने प्रवास करण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात प्रत्येक वर्गाच्या लोकांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये जनरल, स्लीपर, एसी आणि लक्झरी या वर्गांचा समावेश आहे. पण कधी कधी असं होतं की आपण ज्या रेल्वेने जाणार असतो, नेमकी तीच रेल्वे ट्रेन आली नाही तर? आणि आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसते. ट्रेन रद्द झाल्यावर लोकांना सर्वात मोठा त्रास होतो. तुमच्याबाबतीतही असे होऊ नये, म्हणून आज आम्ही तुम्हाला ट्रेन रद्द झाल्याची ऑनलाइन माहिती कशी मिळवू शकता ते सांगणार आहोत. जाणून घ्या
ट्रेन रद्द झाली की नाही हे कसे तपासायचे?
- यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल,
- त्यानंतर ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी 'ट्रेन स्टेटस' किंवा 'ट्रेन कॅन्सलेशन' या पर्यायावर जावे लागेल.
- येथे क्लिक करून तुम्हाला ट्रेनची सद्यस्थिती आणि रद्द केल्याची माहिती मिळेल. जर ट्रेन रद्द झाली असेल, तर तुम्हाला येथे Cancel लिहिलेले दिसेल.
- प्रवासासाठी घर सोडण्यापूर्वी ट्रेनची स्थिती तपासा.
- IRCTC च्या मोबाईल ॲपवर चेक करणे हा एक सोयीचा मार्ग आहे.
- याशिवाय तुमच्या नंबरवर ट्रेन रद्द झाल्याचा मेसेजही येईल.
- लक्षात ठेवा तुमच्या तिकीट बुकिंगवर टाकलेल्या मोबाईल नंबरवर ट्रेन रद्द झाल्याचा संदेश येतो.
- भारतीय रेल्वे कधीकधी एसएमएस किंवा ईमेलद्वारे ट्रेनच्या स्थितीबद्दल माहिती पाठवते.
ट्रेन रद्द झाल्यास परतावा कसा मिळेल?
जर तुम्ही तिकीट रद्द केले नसेल आणि तुमची ट्रेन भारतीय रेल्वेने रद्द केली असेल, तर तुम्हाला अर्ज न करता तिकिटाचा परतावा म्हणजेच रिफंड मिळेल. परंतु परतावा न मिळाल्यास, तुम्ही रेल्वेशी संबंधित माहिती किंवा तक्रारीसाठी Rail Madad हेल्पलाइन नंबर- 139 डायल करू शकता. याशिवाय तुम्ही तुमची तक्रार IRCTC क्रमांक 011-23344787 वर नोंदवू शकता.
हेही वाचा>>>
Weekend Travel : स्वर्गसुखाचा अनुभव देणारं एक शांत गाव! भारतातील इस्रायल म्हणतात 'या' गावाला.. वीकेंडसाठी उत्तम ठिकाण, एकदा पाहाच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )