Women's Day 2022 : दरवर्षी 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाकडे महिला सक्षमीकरण (Women empowerment) म्हणून पाहिले जाते. हा दिवस जगभरातील महिलांच्या कामगिरीचं कौतुक करणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. आज स्त्रिया राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात किती पुढे आला आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे. अशाच एका रेल्वेच्या 'अहिल्या गॅंगची' (Ahilya Gang) कहाणी जाणून घेऊयात. 


जर आपण भारताबद्दल बोललो तर भारतीय महिला देखील कोणापेक्षा कमी नाहीत. बदलत्या काळानुसार भारतीय महिलांनी स्वतःमध्ये बदल निर्माण केला आहे. सामाजिक गैरसमज मोडून काढत महिलांनी राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, व्यवसाय यांसारख्या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.


महिला सक्षमीकरणाचे अगदी अलिकडचे उदाहरण पाहता, मुंबई विभागाच्या मध्य रेल्वेच्या कार्यशाळेतील महिल्यांचा चेहरा समोर येतो. मध्य रेल्वेच्या वतीने ‘अहिल्या गँग’ स्थापन करण्यात आली आहे. या अहिल्या गॅंगमध्ये एकूण 10 महिलांचा समावेश आहे. या महिला मध्य रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये ट्रेनचे इंजिन आणि बॅटरी बॉक्स दुरुस्त करण्याचे काम करतात.


मध्य रेल्वेने नुकतीच अहिल्या गॅंग तयार केली आहे. या महिला ट्रेनला जड उपकरणे लावून अतिशय काळजीपूर्वक आणि कुशलतेने आपले काम पूर्ण करताना दिसतात. मध्य रेल्वेने अहिल्या गॅंगची निर्मिती करणे कौतुकास्पद आहे. अहिल्या टोळीतील महिला आपल्या कार्याने देशातील लाखो महिलांना प्रेरणा देत आहेत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha