Pregnancy Diet: गरोदरपणात महिलांना विविध गोष्टी खायला आवडतात. काही महिलांना आंबट, तर काहींना गोड खायला आवडते. अनेक स्त्रिया गरोदरपणातही बाहेरचे जंक फूड आणि तळलेले भाजलेले पदार्थ खूप खातात. पण, तुम्हाला माहित आहे का की, अशा प्रकारच्या अनहेल्दी अन्नामुळे तुमच्या बाळाच्या विकासावर देखील परिणाम होतो. गरोदरपणात जंकफूड खाल्ल्याने आईची समस्या तर वाढतेच, शिवाय बाळालाही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.


त्यामुळे गरोदरपणात जास्त तळलेले आणि बाहेरचे अन्न न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या काळात तुम्ही फक्त हिरव्या भाज्या, हंगामी फळे आणि घरगुती अन्न खावे. डॉक्टरांच्या मते, आईच्या आहाराचा सर्वात जास्त परिणाम बाळाच्या विकासावर होतो. गर्भवती स्त्रीचा आहार हा पोषक घटकांनी परिपूर्ण असावा.


असा असावा गर्भवतीचा आहार...


* गरोदरपणात महिलांनी वेळोवेळी काहीतरी खात राहावे. यामुळे महिलांमध्ये अपचन आणि उलटीचा त्रास कमी होतो.


* गर्भवती महिलांनी फास्ट फूड, जंक फूड जास्त खाऊ नये.


* जास्त तळलेले-भाजलेले आणि तिखट-मसालेदार खाणे टाळा.


* गरोदरपणात व्हिटॅमिन, आयर्न आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या घ्याव्यात.


* गर्भावस्थेच्या सुरुवातीला 3 महिने फॉलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थ खायला हवे.


* यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकात कॅल्शियम आणि लोह अधिक घ्यावे.


* रोज किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.


* लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अंकुरलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, गूळ आणि तीळ खावे.


* गरोदरपणात उपवास टाळा आणि कच्चे दूध पिऊ नका.


* गरोदरपणात धूम्रपान आणि मद्यपान करू नका.


* कॅल्शियमसाठी भिजवलेले काजू आणि अंजीर खा.


* गरोदरपणात भाज्यांचे सूप आणि फळांचा रस प्या.


* प्रोटीनसाठी तुम्ही दूध, शेंगदाणे, चीज, काजू, बदाम, डाळी, मांस, मासे, अंडी खाऊ शकता.


* फॉलिक अॅसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी मसूर, राजमा, पालक, वाटाणे, मका, हिरवी मोहरी, भेंडी, सोयाबीन, चणे, स्ट्रॉबेरी, केळी, अननस आणि संत्री खा.


* गरोदरपणात संपूर्ण धान्य, दलिया आणि चपाती-भाकरी खावी.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha