Women Health : एका अभ्यासानुसार, आजकाल महिलांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्कोहोलचे सेवन करणे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. सेंटर फॉर डिसीज अँड प्रिव्हेन्शनच्या मते, जर एखाद्या पुरुषाने एका वेळी 5 ड्रिंक्स आणि एका महिलेने 4 ड्रिंक्स घेतली तर ती जास्त मद्यपान करणारी महिला म्हणून गणली जाते. अलीकडेच, अल्कोहोलिक ड्रिंक्सवर एक अभ्यास झाला आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की, ज्या महिला आठवड्यातून आठपेक्षा जास्त अल्कोहोलिक पेये पितात, त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीने नॉर्दर्न कॅलिफोर्नियात 18 ते 65 वयोगटातील 4.32 लाख लोकांवर संशोधन केले, ज्यामध्ये असे दिसून आले की अल्कोहोलमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतोय
अभ्यासात काय म्हटलंय?
'अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी'च्या संशोधनाचा उद्देश हा महिलांमध्ये अल्कोहोल सेवन आणि हृदयरोग यांच्यातील संबंध शोधणे होता, नॉर्दर्न कॅलिफोर्नियामधील कॅन्सर पर्मनंट हेल्थकेअर ऑर्गनायझेशनमध्ये, संशोधकांनी 18 ते 65 वयोगटातील 4.32 लाखांहून अधिक लोकांचा डेटा वापरला आणि त्याचे विश्लेषण केले. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीनुसार, त्या व्यक्तींमध्ये सुमारे 2.43 लाख पुरुष आणि 1.89 लाख महिला होत्या आणि त्यांचे सरासरी वय 44 वर्षे होते. संशोधनात 2014 आणि 2015 मध्ये त्यांची तपासणी करण्यात आली. ते कमी, मध्यम किंवा जास्त प्रमाणात प्यायचे. त्यानंतर 4 वर्षांनी त्यांचा डेटा पुन्हा गोळा करण्यात आला.
कॅलिफोर्नियातील हार्ट स्पेशालिस्ट आणि अभ्यासाचे प्रमुख डॉ. जमाल राणा यांनी फॉक्स न्यूज डिजिटलला सांगितले की, 'आजकाल अशी अफवा पसरवली जात आहे की अल्कोहोलचे सेवन करणे हृदयासाठी चांगले आहे, परंतु संशोधनात वेगळेच पुरावे सापडले आहेत. डॉक्टर सांगतात की, हृदयविकाराचा धोका वाढण्यास अल्कोहोल कारणीभूत ठरू शकते, याबद्दल अधिक जागरूकता असणे आवश्यक आहे.
अल्कोहोल सेवनाची किती मर्यादा असावी?
संशोधनात असे आढळून आले आहे की, पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी दर आठवड्याला 1-2 पेये कमी प्रमाणात मद्यपान म्हणून समजले जाते. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या मते, पुरुषांसाठी दर आठवड्याला 3-14 पेये आणि महिलांसाठी दर आठवड्याला 3-7 पेये मध्यम मद्यपान मानले जातात. तर पुरुषांसाठी आठवड्यातून 15 किंवा त्याहून अधिक पेये आणि महिलांसाठी 8 किंवा त्याहून अधिक पेये अतिमद्यपानाच्या श्रेणीत ठेवण्यात आली होती. चार वर्षांनंतर तपासले असता, संशोधकांना असे आढळले की, अभ्यासातील 3108 लोकांवर कोरोनरी हृदयरोगाचा उपचार करण्यात आला होता, जो जास्त प्रमाणात मद्यपानामुळे वाढला होता. ज्या स्त्रिया आठवड्यातून 8 किंवा त्याहून अधिक पेये पितात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी दारू पिणाऱ्या स्त्रियांपेक्षा 33 ते 51 टक्के जास्त असतो.
अति प्रमाणात मद्यपान करणाऱ्या महिलांवरील अभ्यास काय सांगतो..
अति प्रमाणात मद्यपान करणाऱ्या महिलांवर एक अभ्यास करण्यात आला तेव्हा असे आढळून आले की, माफक प्रमाणात मद्यपान करणाऱ्या महिलांपेक्षा जास्त मद्यपान करणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका दोन तृतीयांश अधिक असतो. डॉ. राणा म्हणतात, 'हे परिणाम धक्कादायक असून युवा स्त्रियांमध्येही मद्यपान केल्याने हृदयविकाराचा धोका वाढेल अशी अपेक्षा नव्हती, कारण अनेकदा वृद्ध महिलांमध्ये याचा धोका अधिक दिसून येतो.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Women Health : 'आजकाल खूपचं चिडचिड होतेय गं..' PCOS मुळे महिलांचे फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही बिघडते? लक्षणं जाणून घ्या, डॉक्टर सांगतात..