Women Health: रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असतो. या काळात महिलांवर मानसिक आणि शारिरीक परिणाम होतो. जेव्हा रजोनिवृत्ती येते तेव्हा पहिला परिणाम मासिक पाळीवर होतो. ठराविक वयानंतर महिलांमध्ये रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागतात, पण तुम्हाला माहीत आहे का की, रजोनिवृत्तीपूर्वी महिलांना पेरीमेनोपॉजचा सामना करावा लागतो. होय, रजोनिवृत्तीची लक्षणे दिसण्यापूर्वी महिलांमध्ये पेरीमेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. रजोनिवृत्ती आणि पेरीमेनोपॉजमधील फरक तसेच पेरीमेनोपॉजची लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घेऊया.


रजोनिवृत्ती आणि पेरीमेनोपॉजमधील फरक


रजोनिवृत्तीला मेनोपॉज देखील म्हणतात. तर, पेरीमेनोपॉजला रजोनिवृत्तीपूर्वीचा काळ म्हणतात. साधारणपणे रजोनिवृत्तीचे वय 40 ते 50 वर्षांच्या दरम्यान असते. पेरीमेनोपॉजसाठी प्रारंभिक वय 30 असू शकते. सहसा वय 40 ते 45 वर्षे असते. रजोनिवृत्ती दरम्यान शारीरिक बदल दिसून येतात. या काळात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. तर, पेरीमेनोपॉज दरम्यान, शारीरिक पेक्षा जास्त मानसिक परिणाम दिसून येतात.


पेरीमेनोपॉज कधी सुरू होतो?


पेरिमेनोपॉज दरम्यान, महिलांची अंडाशय कमी हार्मोन्स तयार करू लागते, ज्यामुळे मासिक पाळी विस्कळीत होते. पेरिमेनोपॉजची सुरुवात अनियमित मासिक पाळीपासून होऊ शकते. हे शारीरिक आणि भावनिक दोन्ही लक्षणांसह आहे. काही लक्षणे तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतात. पेरीमेनोपॉज सुरू होण्याचे वय 30 ते 50 वर्षे असू शकते. या काळात रजोनिवृत्ती सुरू होऊ शकते. काही लोकांना थोड्या काळासाठी या समस्येचा सामना करावा लागतो, तर काही लोक असे आहेत जे पेरिमेनोपॉज अवस्थेत वर्षानुवर्षे राहतात.


पेरीमेनोपॉज झाल्यावर काय होते?


पेरीमेनोपॉज दरम्यान, एखाद्या महिलेला मासिक पाळीशी संबंधित समस्या येऊ शकतात. मासिक पाळी सामान्य नसली, तसेच हार्मोन्सची पातळी कमी होत असली तरीही पेरीमेनोपॉज दरम्यान महिला गर्भवती होऊ शकतात. तर, स्त्रियांना मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर गर्भवती होणे शक्य नसते. रजोनिवृत्तीच्या 8-10 वर्षांपूर्वी पेरीमेनोपॉज सुरू होते.


पेरिमेनोपॉजची लक्षणे



  • मूड बदलणे

  • झोपायला त्रास होणे

  • योनी कोरडेपणा

  • मासिक पाळी थांबणे किंवा अनियमित पाळी येणे

  • अचानक ताप येणे

  • मासिक पाळीचे दिवस वाढणे किंवा कमी होणे


पेरिमेनोपॉजसाठी काय उपचार आहे?


पेरिमेनोपॉजवर कोणताही उपचार नाही. हा स्त्रियांच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे, जेव्हा मासिक पाळी पूर्णपणे थांबते. यानंतर, रजोनिवृत्ती सुरू होते. मात्र, आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून ही लक्षणे टाळू शकता.


जीवनशैलीत हे बदल करा



  • तुमच्या आहारात अधिक फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा.

  • सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे योगा किंवा व्यायाम करा.

  • दिवसातून 10 हजार पावले चालण्याचा प्रयत्न करा.

  • चहा आणि कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पेयांचा वापर कमी करा.

  • दारू, सिगारेट, तंबाखू यासारख्या गोष्टींचे सेवन करू नका.


 


हेही वाचा>>>


Women Health: सावध व्हा गं...चुकूनही करू नका 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष! हृदयविकाराचा झटका येण्याचे 5 संकेत, वेळीच सावध व्हा..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )