Women Health: प्रत्येक महिलेला ती सुंदर दिसावी असं वाटतं. त्यासाठी त्या विविध कपडे, साड्या, ज्वेलरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप... मेकअप म्हणजे महिलांचा आवडता विषय, मग त्यात पावडर, फाऊंडेशन क्रीम, लिपस्टीक, आयलायनर, आणि नेल पॉलिश अशा विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. महिलांना हात-पायांच्या नखांवर नेलपॉलिश लावायला आवडते. विशेषत: जेव्हा एखादा विशेष प्रसंग असतो. मुलीही प्रसंगानुसार नखांना वेगवेगळे रंग लावताना दिसतात. काही मुलींना रोज नेल पेंट बदलण्याची क्रेझ असते. पण तुम्हाला माहित आहे का? नेलपेंट लावल्याने कॅन्सरही होऊ शकतो? एका संशोधनातून माहिती समोर आली आहे. नवीन संशोधनाचे सत्य जाणून घ्या.


नेलपॉलिशमुळे कर्करोग कसा होऊ शकतो?


नेलपॉलिश लावणे बंद करावे असे अद्याप कोणीही तज्ज्ञ म्हणत नसले, तरी काही रिपोर्ट आणि लोकांच्या मते नेलपॉलिशमध्ये कार्सिनोजेनिक घटक असतात. उदाहरणार्थ, एका ब्युटी सोशल इन्फ्लुएंसरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे की, तिने नेलपॉलिश कशी बनवली आहे आणि त्यात अशी रसायने मिसळली आहेत की तिने नेल पेंट लावणं बंद केलंय. खरं तर, नेल पेंट बनवण्यासाठी त्यात टोल्युइन, फॉर्मल्डिहाइड आणि डिप्रोपाइल सारखे पदार्थ मिसळले जातात, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, हे नेल पेंट वापरणे धोक्याचे ठरू शकते. नेलपॉलिश बनवण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात, जी कर्करोगजन्य असतात. या रसायनांपासून बनवलेले नेल पेंट लावल्याने तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढू शकतो.


तज्ज्ञ काय म्हणतात?


तज्ज्ञांच्या मते, नेलपॉलिशच्या आधीही ब्युटी प्रोडक्ट्सबाबत अनेक घातक खुलासे झाले आहेत. त्यामुळे नेलपॉलिश वापरतानाही ते सावधगिरीने वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. अनेक डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, नेल पेंटमध्ये विषारी घटक असतात. त्याच वेळी, इतर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नेल पेंट जितके जास्त चमकदार असेल तितके ते अधिक धोकादायक असू शकते. त्यात घातलेले चमकणारे कण कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. टोल्युइन असलेले नेल पेंट लावल्यानंतर तुम्हाला डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते. डिब्युटाइल फॅथलेटपासून बनवलेले नेल पेंट लावल्याने प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.


तज्ज्ञांच्या मते नेल पेंट खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश खरेदी करता तेव्हा आधी त्यामागे लिहिलेले साहित्य वाचा



  • टोल्युएन

  • फॉर्मल्डिहाइड

  • डाइब्यूटिल फथलेट

  • कापूर

  • जाइलीन


तुमच्या नखांची अशी काळजी घ्या



  • केमिकल फ्री नेल पेंट लावा.

  • वर नमूद केलेल्या गोष्टींपासून बनवलेले नेलपॉलिश लावू नका.

  • नखांमध्ये काही इन्फेक्शन असेल तर त्या वेळी कोणतेही नेल पेंट लावू नका.

  • उच्च चमक आणि चमकदार रंगाचे नेलपॉलिश वापरणे टाळा.


 


हेही वाचा>>>


Women Health: सावध व्हा गं...चुकूनही करू नका 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष! हृदयविकाराचा झटका येण्याचे 5 संकेत, वेळीच सावध व्हा..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )