Women Health: कोणत्याही स्त्री साठी आई होणं ही अत्यंत आनंदाची बाब असते, मातृत्व हे निसर्गाने दिलेलं एक वरदान समजले जाते. अशात काही स्त्रियांना जुळी मुलं जन्माला येतात. विज्ञानानुसार, ही एक आश्चर्यकारक आणि मनोरंजक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते आणि तिच्या पोटात दोन मुलं एकत्र विकसित होतात, तेव्हा जुळी मुले जन्माला येतात. पण तुम्हाला माहित आहे का की दोन मुले पोटात एकत्र कशी वाढू लागतात? त्यामागचे शास्त्र काय आहे? वैद्यकीय भाषेत याला एकाधिक गर्भधारणा म्हणतात. काही अहवालांनुसार, जगभरात दरवर्षी अंदाजे 1.6 दशलक्ष जुळी मुले जन्माला येतात. जुळी मुले कशी जन्माला येतात आणि कोणत्या स्त्रीला जुळी मुले होण्याची जास्त शक्यता असते ते समजून घेऊया?


जुळे 'या' दोन कारणांमुळे होतात


आयडेंटिकल ट्विन्स - यामध्ये जेव्हा एकच अंडी दोन भागात विभागली जातात, तेव्हा त्याला आयडेंटिकल ट्विन्स म्हणजेच जुळी मुलं होतात. यामध्ये, दोन्ही मुले गुणसुत्रांच्या बाबतीत पूर्णपणे सारखीच असतात आणि अनेकदा सारखी दिसतात.


फ्रॅटर्नल ट्विन्स - गर्भाशयात जेव्हा दोन भिन्न अंडी आणि दोन भिन्न शुक्राणू एकत्र येतात, तेव्हा ते जुळी मुले तयार करतात. ही जुळी मुले सामान्य भावंडांप्रमाणे असतात, जी गुणसुत्रांमध्ये 50% सारखी असू शकतात. या प्रक्रियेत दोन्ही अंडी वेगळ्या गर्भाशयात फलित होतात.


कोणत्या स्त्रियांना जुळी मुले होण्याची अधिक शक्यता असते?


गुणसुत्रे- जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात जुळी मुले जन्माला आल्याचा इतिहास असेल तर त्या महिलेलाही जुळी मुले असण्याची शक्यता असते.


वय- एबीपी हेल्थ लाइव्हच्या व्हिडिओनुसार, असे आढळून आले आहे की, 30 ते 40 वर्षे वयोगटातील स्त्रिया, विशेषत: ज्यांना पहिल्यांदा गर्भधारणा झाली आहे, त्यांच्यातही जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता जास्त असते.


उंची आणि वजन- उंच आणि जास्त वजन असलेल्या स्त्रियांना जुळी मुले होण्याची शक्यता जास्त असते.


प्रजनन उपचार- IVF किंवा इतर प्रजनन उपचारांच्या मदतीने महिला गर्भवती होऊन जुळ्या मुलांना जन्म देऊ शकतात.


वंश- जगात अशा काही वंश आहेत, ज्यात जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता जास्त असते. जसे की, आफ्रिकन महिला.


जुळी मुलं होण्याची लक्षणं



  • जास्त प्रमाणात मॉर्निंग सिकनेस जाणवणे.

  • सामान्यपेक्षा जास्त वजन वाढणे.

  • जास्त भूक लागल्याने जुळी मुलं होण्याची शक्यताही वाढते.

  • गर्भाची जास्त हालचाल सर्व स्त्रियांना जाणवत नाही.

  • वारंवार लघवी होणे हे देखील एक लक्षण आहे.


हेही वाचा>>>


Women Health: गरोदर महिलांच्या 'या' चुकांमुळे बाळाचा चेहरा बिघडू शकतो? गर्भावर होतो परिणाम? अभ्यासात म्हटलंय...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )