Women Health: मातृत्व हे निसर्गाचं सुंदर देणं आहे. प्रत्येक स्त्री साठी आई होणं म्हणजे जीवनातील सर्वात मोठा आनंद असतात. एखादी महिला जेव्हा गरोदर राहते, तेव्हा तिला अनेक चांगल्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. अशा काळात स्त्री ला सगळ्यात जास्त काळजीची गरज असते. कारण गरोदर महिलांच्या प्रत्येक कृतीचा गर्भातील बाळावर परिणाम होत असतो. मात्र एका अभ्यासात या संदर्भात धक्कादायक खुलासे झाले आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, गरोदर असताना महिलेच्या काही चुकांचा गर्भाच्या काही वैशिष्ट्यांवर परिणाम होऊ शकतो. कसे ते जाणून घ्या?
गरोदर महिलेच्या काही चुकांमुळे बाळाच्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य बदलू शकते?
आपल्या मुलाचा जन्म निरोगी व्हावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. म्हणून, गर्भधारणेदरम्यान, गरोदर महिला प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेते. ती पुरेसा आहार देखील घेते, जो गरोदर महिलेसाठी खूप महत्वाचा आहे. गरोदरपणात कोणत्याही गोष्टीचे सेवन केल्यास गर्भावर चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होतात. अलीकडेच एका अहवालात असे समोर आले आहे की गर्भवती महिलेच्या आहारामुळे बाळाच्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य बदलू शकते. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, गर्भवती महिलेच्या खाण्याच्या सवयीमुळे तिच्या मुलाच्या चेहऱ्याचा आकार बदलू शकतो. आईने घेतलेला आहार गर्भाच्या काही वैशिष्ट्यांवर परिणाम करू शकतो. जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या आहाराचा गर्भावर परिणाम होतो?
गर्भावर विपरीत परिणाम कसा होतो?
संशोधकांच्या मते, आईच्या आहारातील प्रोटीनचा स्तर गुणसुत्रांच्या क्रियाकलापांशी जोडला गेली आहे. विशेषतः mTORC1 या गुणसुत्राशी जोडलेले आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, प्रथिनांच्या माध्यमातून गुणसुत्रांच्या क्रियाकलापांमध्ये बदल होतो. नंतर गर्भाच्या क्रॅनिओफेशियल आकारावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत मुलाचे नाक लांब होऊ शकते आणि चेहऱ्याचा आकार बदलू शकतो.
प्रोटीनची महत्वाची भूमिका़
संशोधकांना असे आढळले की, आईच्या आहारातील प्रथिने पातळी मॉड्युलेशन mTORC1 गुणसुत्रांना नियंत्रित करते. अशावेळी बाळाच्या चेहऱ्याचा आकार बदलू शकतो. हे देखील नोंदवले गेले आहे की, उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे मुलांमध्ये मजबूत, मोठे नाक आणि मोठ्या जबड्याची रेषा विकसित होते. तर, आहारात कमी प्रथिनांचा समावेश केल्यास बाळ कमी वजनाचे होऊ शकते आणि त्याच्या नाक किंवा जबड्याच्या आकारावर लक्षणीय परिणाम होतो. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की, गरोदर महिलेने गर्भधारणेदरम्यान तिच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने असणे खूप महत्वाचे आहे.
आहारातील बदल गर्भावर परिणाम करतात?
शास्त्रज्ञांनी गरोदर असलेली मादी उंदीर आणि झेब्रा फिशवर संशोधन केले होते. अशा परिस्थितीत त्यांनी वागणूक पाहिली. संशोधनाचा भाग म्हणून, शास्त्रज्ञांनी प्राण्यांना अनुवांशिकरित्या हाताळले आणि त्यांच्या पोषण पातळीत बदल करून त्यांच्या मुलांमध्ये होणारे बदल देखील पाहिले. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट झाले की, पोषणातील बदल गर्भावर परिणाम करतात आणि नंतर जन्मानंतर मुलांमध्ये बदल दिसून येतात.
हेही वाचा>>>
Women Health: जुळं... तिळं... एखाद्या स्त्रीला एका वेळी एकापेक्षा जास्त मुलं कशी होतात? कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )