Women Health : वाढत्या वयानुसार महिलांना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. जसे की शारिरीक आणि मानसिक बदल.. काही महिला त्यांच्या व्यस्त जीवनात स्वत:ची काळजी घ्यायला विसरतात. सध्या ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजेच स्तनांचा कर्करोग हा आजार महिलांमध्ये असणे एक सामान्य बाब समजली जातेय. जेव्हा जेव्हा स्त्रियांमध्ये कर्करोगाचा विचार केला जातो, तेव्हा स्तनाचा कर्करोग याबद्दल नक्की बोलले जाते. सामान्यतः असे मानले जाते की, स्तनाचा कर्करोग प्रौढ आणि वृद्ध महिलांमध्ये होतो आणि हे बऱ्याच अंशी खरे देखील आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना हे माहित नाही की आजकाल किशोरवयीन मुलींमध्ये देखील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दिसून येत आहे. 


 


किशोरवयीन मुलींमध्ये स्तनाचा कर्करोग दुर्मिळ... पण...


ओन्ली हेल्थ वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार पुणे येथील डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉ. समीर गुप्ता जे  कर्करोग तज्ज्ञ आहेत, ते म्हणतात की, किशोरवयीन मुलींमध्ये स्तनाचा कर्करोग अत्यंत दुर्मिळ आहे, तरीही अलीकडच्या काळात त्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पौगंडावस्थेतील मुलींमध्ये याचे वेळीच निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात. भविष्यात त्याचा धोका कमी करता येतो. आता प्रश्न असा येतो की, किशोरवयीन मुलीमध्ये स्तनाचा कर्करोग कसा समजू शकतो?


 


स्तनाच्या कर्करोगाची 8 लक्षणे


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुलींमध्ये स्तनाचा कर्करोग सुरू होतो, तेव्हा तुम्हाला अनेक चिन्हे आणि लक्षणे दिसू शकतात, जी वेळेत ओळखता येतात आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता, काही चाचण्या करून याची खात्री करू शकतात आणि तुम्ही ताबडतोब उपचार घेऊ शकता. उपचार देऊ शकतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला किशोरवयीन मुलींमध्ये स्तनाच्या कर्करोगाची 8 चिन्हे आणि लक्षणे सांगत आहोत. प्रौढ किंवा सामान्य महिलांप्रमाणे, किशोरवयीन मुलींना देखील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू शकतात. ज्याची काही लक्षणे अतिशय सामान्य आहेत...



  • पहिले लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ.

  • स्तनाची गाठ कडक होणे

  • स्तनाच्या आकारात किंवा निप्पलमध्ये अस्पष्ट बदल

  • काखेच्या किंवा मानेखालील लिम्फ नोड्स

  • स्तनाग्रातून स्त्राव

  • स्तनांमध्ये लालसरपणा आणि सूज

  • एक स्तन जो लाल किंवा सुजलेला दिसतो

  • स्तनांना खाज सुटणे आणि चकचकीत त्वचा



स्तनाचा कर्करोग कसा होतो?


काही मुलींना कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते
ज्यांच्या कुटुंबात कोणीतरी किंवा स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे
अनुवांशिक बदल
शारीरिकरित्या सक्रिय नसणे
हानिकारक किरणांच्या संपर्कात अधिक वेळ घालवणे
मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या सवयी
इस्ट्रोजेन थेरपी
हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या घेणे
जंक आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन


स्तनाचा कर्करोग कसा टाळावा?


निरोगी जीवनशैलीचे पालन करून महिला स्तनाच्या कर्करोगाचा धोका सहज कमी करू शकतात. त्यामुळे सकस आणि पोषक आहार घ्या. नियमित व्यायाम करा किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. धूम्रपान, दारू आणि तंबाखूपासून दूर राहा. सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवा. जास्त तळलेले, खारट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.


 


हेही वाचा>>>


Women Health : तुमची 'लाडकी लेक' वयात येणार! तिच्या पहिल्या मासिक पाळीसाठी 'असं' करा तयार, या गोष्टींबद्दल जरूर बोला


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )