Women Health : काय करू ताई.... प्रसूतीनंतर माझे वजन खूप वाढलंय हो, असं काय करू की वजन नियंत्रणात येईल आणि फिगरही पूर्वीप्रमाणेच दिसेल.. असे महिलांच्या तोंडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अर्थातच गरोदरपणात वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही, पण प्रसूतीनंतर तुम्ही तुमच्या बदललेल्या जीवनशैलीने तुमचे शरीर तंदुरुस्त आणि मेंटेन ठेवू शकता. याच्याशी संबंधित काही सोप्या टिप्स आरोग्यतज्ज्ञांकडून जाणून घेऊया


 


प्रसूतीनंतर वजन कसे कमी होईल?


प्रसूतीनंतर कोणत्याही महिलेची जीवनशैली खूप बदलते. आता तुम्हाला स्वतःसोबतच तुमच्या मुलाची काळजी घ्यायची असल्याने शरीर तंदुरुस्त आणि मेंटेन ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही तुमची जुनी फिगर कशी परत मिळवू शकता, त्यासाठी शारीरिक आणि भावनिक बदल कसे हाताळू शकता, याबाबत अनेक महिलांना माहिती असणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतर गरोदरपणात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर आठव्या आठवड्यापासून व्यायाम सुरू करता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलाच्या जन्मानंतर शरीर अत्यंत संवेदनशील बनते. अशा परिस्थितीत, दररोज व्यायाम करण्याऐवजी, पर्यायी दिवसात व्यायाम करणे आणि त्यानंतर स्ट्रेचिंग करणे महत्वाचे आहे.


 


प्रसूती नंतरच्या सहा महिन्यांनंतरच व्यायाम सुरू करा


तुमच्या छातीचा भाग मजबूत करण्यासाठी तुम्ही पुशअप्स करू शकता, तसेच तुमच्या कंबरेचे स्नायू बळकट करण्यासाठी क्रंच करू शकता. त्याच वेळी, पाय मजबूत करण्यासाठी स्क्वॅट्स करण्याचा सल्ला दिला जातो. सामान्य प्रसूतीच्या सहा आठवड्यांनंतर आणि सिझेरियन प्रसूतीच्या बाबतीत सहा महिन्यांनंतरच व्यायाम सुरू करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलाच्या जन्मानंतर, हार्मोन्स सहा महिने हायपरएक्टिव्ह राहतात.


 



तुम्ही याप्रमाणे सुरुवात करू शकता


पहिली स्टेप म्हणजे चालणे. दररोज 10 मिनिटे चाला आणि सुमारे 4 आठवडे हे करा. यानंतर वेळ 30 ते 40 मिनिटांपर्यंत वाढवा. हे सुमारे आठ आठवडे सतत करा. आई झाल्यानंतर शरीर आतून बळकट करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रोटीनचे सेवन करा. तुमच्या आहारात प्रथिनांचा समावेश करा. यासाठी तुम्ही उकडलेले चणे, मूग डाळ, राजमा आणि काळे हरभरे खाऊ शकता. यासोबतच सॅलड आणि फायबरयुक्त आहार घेणे सुरू करा.


 


 


हेही वाचा>>>


Women Health : तुमची 'लाडकी लेक' वयात येणार! तिच्या पहिल्या मासिक पाळीसाठी 'असं' करा तयार, या गोष्टींबद्दल जरूर बोला


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )