Painkillers For Periods Pain: मासिक पाळी (Menstruation) एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिलेला वयाच्या विशिष्ठ टप्प्यात मासिक पाळी येण्यास सुरुवात होते आणि एका विशिष्ठ टप्प्यावर रजोनिवृत्ती (Menopause) होते. पण आजही मासिक पाळीबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. आजही अनेक महिला मासिक पाळीबाबत (Menstrua Cycle) चारचौघांत बोलणं टाळतात. पण मासिक पाळीचे (Periods) दिवस प्रत्येक महिलेसाठी अत्यंत वेदनादायी आणि त्रासदायक असतात. 


मासिक पाळीची वेळ बहुतेक स्त्रियांसाठी कठीण असते, कारण मासिक पाळीच्या त्या दिवसांमध्ये महिला आणि मुलींना पोटदुखी, पिरियड क्रॅम्प्स, पाठदुखी, ताप आणि अशक्तपणा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तसेच, काही गंभीर प्रकरणांमध्ये, उलट्या आणि चक्कर येणं यांसारख्या समस्या देखील दिसतात. काही महिलांना अति पोटदुखीमुळे वैद्यकीय मदत घ्यावी लागते. तर काहीजण दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याची बाटली आणि हर्बल चहा यांसारख्या उपायांचा अवलंब करतात. (Ways To Get Relief From Periods Pain)




मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी महिला अनेकदा पेनकिलर घेतात. खरंच मासिक पाळीत पेनकिलर घेणं सुरक्षित आहे का? असे प्रश्नही अनेकदा पडतात. मासिक पाळीदरम्यान, पेनकिलर औषधं घेणं खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर... 


मासिक पाळीत पेनकिलर घेणं सुरक्षित आहे का? 


मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत महिलांना प्रचंड त्रास होतो. पोटदुखी, पिरियड क्रॅम्प्स, ताप यांमुळे अगदी बेजार व्हायला होतं. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला सर्रास पेनकिलर्स घेतात. परंतु, तुम्हाला हे माहीत असायलाच हवं की, तुमचं असं सतत करणं तुमच्या आरोग्यासाठी अनेक समस्या निर्माण करतात. 


मासिक पाळी दरम्यान गर्भाशयातील एंडोमेट्रियम निघून जातात. हे प्रोस्टॅग्लँडिन नावाच्या हार्मोन्समुळे होतं. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावू लागतं. सूज आणि वेदना जाणवतात. त्याचप्रमाणे, जेव्हा प्रोस्टॅग्लँडिनची पातळी जास्त होते, तेव्हा फायब्रॉइड्स तयार होतात, ज्यामुळे मासिक पाळी दरम्यान समस्या वाढू शकतात. 




पीरियड्समध्ये पेनकिलर खाणं फायदेशीर? (Is It Beneficial To Take Painkillers During Periods?)


पीरियड क्रॅम्प्सपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलरचं सेवन करू शकता. हलक्या-फुलक्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही नॉनस्टेरॉयडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAID) चं सेवन करू शकता. ही औषधं प्रोस्टॅग्लँडिनची पातळी वाढण्यापासून रोखतात, ज्यामुळे गर्भाशयात आकुंचन कमी होतं आणि वेदना देखील कमी होतात. साधारणपणे, तज्ज्ञ दर 12 तासांनी 1 पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. दरम्यान, कोणत्याही प्रकारचं औषध घेण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं.  


पीरियड्समधील वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय



  • खूप पाणी प्या आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा 

  • ज्यामुळे ब्लोटिंग होणार नाही, अशी फळं आणि भाज्या खा 

  • व्हिटॅमिन डीचं अधिक सेवन करा 

  • व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असणारे पदार्थ खा 

  • हलका व्यायाम करा 

  • ओटीपोटाला गरम पाण्याच्या पिशवीनं शेक द्या


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sexual Wellness: लैंगिक संबंधांनंतर महिलांनी 'या' 3 गोष्टी नक्की कराव्यात; बॅक्टेरियल इंफेक्शन्सपासून होईल बचाव!