Mother's Day 2024 : 'आ' म्हणजे आकाश आणि 'ई' म्हणजे ईश्वर, ईश्वराप्रमाणे आभाळाएवढी माया करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे 'आई..! आई म्हणजे दयेचा सागर, आई म्हणजे अख्ख जगच जणू... अशा या आईचे उपकार आपण मानावे तितके कमीच आहेत. तसा प्रत्येक दिवस आईसाठी समर्पित आहे. पण आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे जागतिक मातृदिन म्हणजेच मदर्स डे.. यंदा 12 मे रोजी मदर्स डे आहे. जर तुम्हालाही हा दिवस खास बनवायचाय?  तुमच्या आईला आनंदी ठेवण्यासाठी काही सरप्राईज प्लॅन करायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही खास आयडिया सांगत आहोत, त्या जाणून घ्या..



प्रत्येक परिस्थितीत 'ती' मुलांच्या पाठीशी खंबीर उभी असते...


यंदा रविवार, 12 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी आईच्या प्रेमाची आणि त्यागाची प्रशंसा, कौतुक करण्यासाठी दरवर्षी जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. मुलंही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती असते. प्रत्येक परिस्थितीत ती मुलांच्या पाठीशी खंबीर उभी असते. म्हणूनच, मदर्स डे आपल्या आईचे आभार मानण्याची आणि तिला विशेष वाटण्याची एक चांगली संधी प्रदान करतो. 



आईला बाहेर फिरायला घेऊन जा


मदर्स डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आईला आनंद देऊ शकाल अशा काही गोष्टी देऊन तिला आश्चर्यचकित करू शकता. जसे की तुम्ही त्यांना कुठेतरी पिकनिकला किंवा मैफिलीला घेऊन जाऊ शकता. त्यांना कोणत्याही लोकप्रिय मंदिरात नेऊन दर्शन घेता येते. या व्यतिरिक्त तुम्ही काही धार्मिक स्थळी सहलीची योजना देखील बनवू शकता.



रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जा



प्रत्येक आईला कधी ना कधी घरी अन्न शिजवून स्वतःच्या हाताने खाऊन कंटाळा येतो. अशा परिस्थितीत, आपण रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एखाद्याला बाहेर नेण्याचा विचार करू शकता. तुमच्या आईला हे सरप्राईज नक्कीच आवडेल आणि तिलाही खास वाटेल.



आईसोबत 'क्वालिटी टाईम' घालवा



आई सहसा घरातील कामात व्यस्त असते. पण, तिच्याकडे तिच्या मुलांसाठी नेहमीच वेळ असतो आणि त्यांनीही तिच्यासोबत बसून तासनतास तिच्याशी बोलावं अशी तिची इच्छा आहे. मात्र, मुले त्यांच्या अभ्यास आणि नोकरीत इतकी व्यस्त झाली आहेत की त्यांना त्यांच्या आईसाठी वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईसोबत मोकळेपणाने वेळ घालवणे ही तिच्यासाठी मोठी भेट ठरू शकते. त्यामुळे तुम्ही काही करत नसाल, तर मदर्स डे स्पेशल बनवण्यासाठी तुमच्या आईसोबत तासनतास बसून बोला. तुम्ही तुमच्या बालपणीच्या किंवा त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टींबद्दल बोलू शकता. 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Mother's Day 2024 : स्वत:चं दुखणं लपवत मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या आईला द्या निरोगी आरोग्याची भेट! 'मदर्स डे' बनवा खास, 'या' टेस्ट नक्की करा