Fashion Tips : मुलींसाठी पोशाखांच्या संदर्भात बरेच पर्याय आहेत. भारतीय पोशाखांपासून ते वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत त्यांच्यासाठी अनेक फॅशन आणि स्टाइलिंग कल्पना आहेत. परंतु मुलींनी त्यांच्या रंग, शरीराचा आकार आणि उंचीनुसार कपडे निवडले पाहिजेत. जेणेकरून ते अधिक सुंदर दिसू शकतील. कपड्यांच्या निवडीबाबत मुलींनीही त्यांच्या उंचीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक वेळा लहान उंचीच्या मुली असे काही कपडे घालतात ज्यामुळे त्यांची उंची लहान दिसायला लागते. लहान उंचीच्या मुली किंवा स्त्रिया उंच दिसण्यासाठी हिल्स घालण्यावर भर देतात. परंतु कपड्यांच्या योग्य निवडीसह, अगदी लहान मुलीही उंच दिसू शकतात. जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्हाला उंच दिसायचे असेल, तर तुमच्यासाठी काही आउटफिट आयडिया आहेत, ज्याचा वापर केल्यास तुमची उंची वाढलेली दिसेल. कोणत्या आहेत त्या आयडिया जाणून घेऊ.


- आजकाल बहुतेक मुली जीन्स घालणे पसंत करतात. मुली कॉलेज-ऑफिस वेअरपासून पार्टी वेअरपर्यंत जीन्स घालतात. अशा परिस्थितीत, जर लहान उंचीच्या मुलींनी स्वतःसाठी योग्य प्रकारची जीन्स निवडली तर त्यांची लांबी अधिक दिसू शकते. कमी उंचीच्या मुलींनी हाय वेस्ट जीन्स घालावी. याशिवाय कमी उंचीच्या मुलींनी त्यांच्या वॉर्डरोबमध्ये बेल बाॅटम जीन्स, स्ट्रेट जीन्स आणि स्किनी जीन्सचा समावेश करू शकतात. या प्रकारच्या जीन्समध्ये मुलींची उंची अधिक दिसते.


- ट्रेडिशनल कपडे घालायला आवडत असेल तर कमी उंचीच्या मुलींनी लांबलचक कुर्तीसोबत लेगिन घालावी. अनारकली सूटमध्येही उंची जास्त दिसते पण कमी उंचीच्या मुलींनी अनारकली सूटमध्ये व्ही नेकलाइन निवडावी. कमी उंचीच्या मुलींनी सलवार किंवा प्लाजो घालू नये, यामध्ये त्यांची उंची कमी दिसते.


- जर तुम्हाला वेस्टर्न पोशाख घालायचा असेल, आणि तुमची उंची कमी असेल तर मॅक्सी ड्रेस अजिबात घालू नका . शाॅर्ट स्कर्ट आणि शाॅर्ट टाॅप तुम्ही घालू शकता.


- कमी उंचीच्या मुलींनी जर व्हर्टिकल प्रिंट असणारे कपडे घातले तर त्यांची उंची अधिक दिसू शकते. हॉरीझॉन्टल प्रिंट शक्यतो टाळावे याने तुमची उंची आणखी कमी दिसेल.


- जेव्हा तुम्ही एकाच रंगाची कुर्ती आणि पँट घालता तेव्हा तुमची उंची अधिक दिसते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगवेगळ्या कुर्ती आणि वेगवेगळ्या रंगाचे बॉटम घालता, तेव्हा त्यात तुमची उंची कमी दिसते.


 


इतर महत्वाच्या बातम्या