Fashion : साडी म्हणजे मायेची ऊब.... साडी म्हणजे मायेचा पदर...साडी म्हणजे जीवाभावाची मैत्रीण... साडी म्हटलं की कोणत्याही स्त्रीचा जीव की प्राण..! आयुष्यातील खास क्षणांना तिने नेसलेली साडी म्हणजे एक प्रकारे आठवणींचा ठेवाच आहे. त्यामुळेच साडी ही भारतातील बहुतांश महिलांची पहिली पसंती आहे. भारतातील साडी हे विविधता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. येथे प्रत्येक राज्याची स्वतःची साडी आहे, जी त्याच्या कारागिरी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. भारतात अनेक प्रकारच्या साड्या उपलब्ध असतील. पण आज आम्ही अशा 5 साड्यांबद्दल सांगणार आहोत ज्या देशभरात प्रसिद्ध आहेत.





पैठणी साडी


पैठणी साडी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडी आहे. पैठणी साडीचा इतिहास खूप जुना आहे. औरंगाबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या पैठण नावाच्या ठिकाणी सातवाहन राजवटीत पैठणी बनवण्याची सुरुवात झाली. या ठिकाणाच्या नावावरून या साडीला पैठणी असे नाव पडले. यानंतर पुण्याच्या पेशव्यानेही शिर्डीजवळ येवला येथे बनवण्यास सुरुवात केली. पैठणी साडी तुतीच्या सिल्कपासून बनविली जाते आणि तिच्या पल्लू आणि बॉर्डरवर जरीचे काम असते. पैठणीच्या सुरुवातीच्या काळात, साड्या कापसाच्या बनवल्या जात होत्या आणि त्याची सीमा बनवण्यासाठी रेशमाचा वापर केला जात असे. पण हळूहळू पैठणीत बदल होत गेला आणि आता बनवलेली पैठणी फक्त रेशमापासून बनवली जाते.




कांजीवरम साडी



ही तामिळनाडूची एक प्रसिद्ध साडी आहे, जी तिच्या सौंदर्यासाठी आणि सोन्याच्या किनार असलेली साडी म्हणून ओळखली जाते. कांजीवरम साडी विशेषत: रंगीबेरंगी नक्षीकाम आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. या सिल्क साडीचे उत्कृष्ट नक्षीकाम महिलांना आवडते.




बंगाली साडी


पश्चिम बंगालच्या स्त्रिया मुख्यतः लाल आणि पांढऱ्या साड्या घालतात, हा एक प्रसिद्ध लुक आहे जो देशभरात प्रिय आहे. या साड्या सहसा लाल बॉर्डरसह पांढऱ्या रंगाच्या असतात. जवळजवळ प्रत्येक बंगाली स्त्री दुर्गा पूजा, लग्न किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात नेसते.




बनारसी साडी


उत्तर प्रदेशातील वाराणसी भागात बनवलेल्या बनारसी साड्या त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. देशभरातील लोक जेव्हा बनारसला फिरायला येतात तेव्हा ते ही साडी सोबत घेऊन जातात. या साडीमध्ये सोन्या-चांदीचे धागे वापरण्यात आले असून उत्कृष्ट नक्षीकामही करण्यात आले आहे. त्यात जितके कोरीवकाम आणि कारागिरी आहे, विशेष म्हणजे ही तितकीच महाग असलेली साडी बाजारात मिळते.




पटोला साडी


केरळच्या पटोला साड्या हलक्या सुती कापडापासून बनवल्या जातात. पटोला साडी ही उन्हाळ्यात नेसण्यासाठी सर्वोत्तम साडींपैकी एक आहे. यामध्ये रंगीबेरंगी नक्षीकाम, ज्यूट आणि तारापासून बनवलेल्या डिझाईन्स आहेत, ज्यामुळे पटोला साडी आणखी सुंदर बनते.




गुजराती साडी


गुजरातचे लोक त्यांच्या कपड्यांसाठी ओळखले जातात. इथल्या चन्या-चोलीही जगभर प्रसिद्ध आहेत, ज्या जगभरात गरबा खेळताना परिधान केल्या जातात. गुजराती साड्यांचे विविध प्रकार आहेत, जसे की लहरिया साडी. यामध्ये वेगवेगळे रंग, व्हरायटी आणि डिझाइन्स आहेत.


 


हेही वाचा>>>


Fashion : 'दिसशी तू नवतरुणी काश्मिरी..!' साडी नेसून सुंदर दिसालच, पण 'या' हेअरस्टाईलने लागतील चारचांद!


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )