Women Health Tips : मासिक पाळीचे (Periods) ते पाच दिवस स्त्रियांच्या (Women) सामान्य दिवसांपेक्षा खूप वेगळे असतात. या पाच दिवसांत महिलांना अंग दुखणे आणि थकवा जाणवणे, अस्वस्थ वाटणे यांसारख्या अनेक समस्या जाणवतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिलांनी या काळात निरोगी आहाराचं पालन करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांना शरीरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. खरंतर, मासिक पाळीच्या संदर्भात इंटरनेटवर अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधली जातात. त्यातलाच सर्वात जास्त शोधला जाणारा प्रश्न म्हणजे  मासिक पाळी दरम्यान व्यायाम करावा की करू नये? व्यायामाने पाळीच्या वेदना वाढणार तर नाहीत? या आणि अशाच संदर्भात अधिक प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


मासिक पाळी दरम्यान व्यायाम करता येतो की नाही?


आरोग्य तज्ञांच्या मते, तुम्ही मासिक पाळी दरम्यान पूर्णपणे व्यायाम करू शकता. पण, हार्ड वर्कआऊट करणं टाळा. जास्त वेळ व्यायाम करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. सामान्य व्यायाम केल्यास तुम्हाला दुखण्यापासून नक्कीच आराम मिळेल. पण जास्त व्यायामामुळे तुमच्या शरीरात क्रॅम्प्स, स्नायू दुखणे, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. मासिक पाळी दरम्यान जास्त व्यायाम केल्याने कंबर आणि खालच्या ओटीपोटात वेदना वाढू शकतात. त्यामुळे मासिक पाळीत हलका व्यायाम करा. 


मासिक पाळी दरम्यान व्यायाम करता येईल का?



  • मासिक पाळीत नियमित व्यायाम केल्यास तुमचा आळस आणि थकवा दूर होईल. याशिवाय मूड स्विंगच्या समस्याही काही प्रमाणात दूर होतात. 

  • मासिक पाळीत स्तनाची सूज देखील व्यायामाने कमी होते. बर्‍याच महिलांना मासिक पाळीत जास्त भूक लागते, त्यामुळे जेव्हा त्या व्यायाम करतात तेव्हा खाण्याच्या विकारावर काही प्रमाणात नियंत्रण होते. 

  • मासिक पाळीच्या दरम्यान तणाव आणि चिडचिडेपणाची समस्या असल्यास अशा लोकांनी व्यायाम केल्यास ही समस्याही दूर होऊ शकते. 


मासिक पाळीत जास्त व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नाही


पीरियड्स दरम्यान जास्त व्यायाम करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. मासिक पाळीच्या दरम्यान 30-40 मिनिटे व्यायाम करणे चांगले आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त व्यायाम केला तर तुम्हाला पोटदुखी आणि पाठदुखीची तक्रार होऊ शकते. 


जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या.



  • मासिक पाळीत चुकूनही रिकाम्या पोटी व्यायाम करू नका.

  • जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका. पण जेवल्यानंतर काही तासांनी व्यायाम सुरू करा.

  • मासिक पाळीच्या वेळी सैल कपडे घालून व्यायाम करा.

  • शरीर जास्त ताणू नका


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : लहान वयातच मुलाचे केस पांढरे होतायत? ही समस्या दूर करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा