Grey Hair in Kids : अवेळी केस गळणे, केसांना टक्कल पडणे, केस गळणे, अकाली पांढरे (White Hair) होणे यांसारख्या समस्यांमुळे केवळ महिला आणि पुरुषच त्रस्त असतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण आता महिला आणि पुरुषांप्रमाणेच लहान मुलेही या समस्येला बळी पडत चालले आहेत. खरंतर, बालपणात केस पांढरे होण्यामागे पोषणाचा अभाव हे सर्वात मोठे कारण आहे. आजकाल आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी इतक्या बदलत चालल्या आहेत की यामध्ये फक्त जीभेचे चोचले पुरवण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माक्ष, यामध्ये कोणतीही पोषक तत्त्वे शरीराला मिळत नाहीत. तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशाच खाण्यापिण्याची सवय लावत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, तुमच्या या सवयीमुळे मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जसे की, डोळे कमकुवत होणे, मधुमेह, लठ्ठपणा आणि केस पांढरे होणे... या अशा काही समस्या आहेत ज्या आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहेत.


असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने मुलांचे केस पांढरे होण्यापासून वाचू शकतात. याच संदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी सांगिलेले उपाय जाणून घेऊयात.   


आवळा


आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध आहे, ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. आवळा चवीला कडू असल्यामुळे तुम्ही त्याचा जाम किंवा लोणचं करून मुलांना खायला देऊ शकता.


काळे तीळ


काळे तीळ मेलेनिनचे प्रमाण वाढवते, जे आपल्या त्वचेचा आणि केसांचा रंग राखण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही लहान मुलांना काळ्या तिळाचे लाडू खायला देऊ शकता किंवा काळ्या तिळाची पावडर करून त्यापासून बनवलेले पदार्थही खायला देऊ शकता.    


काळा मनुका


मनुका हा लोहाचा उत्तम खजिना आहे. त्यात व्हिटॅमिन सी देखील असते, जे लोह लवकर शोषून घेते आणि केसांना पुरवते. यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या तर दूर होतेच पण केस गळती देखील दूर होते.


कढीपत्ता


कढीपत्त्यात भरपूर जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि बी 12 असतात. याशिवाय त्यामध्ये लोह आणि कॅल्शियम देखील असते. यामुळे केस गळणे आणि पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.


देशी तूप


देशी तुपाचा वापर जेवणात केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने केसांची गुणवत्ता सुधारते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहापासून दूर राहण्यासाठी केवळ मिठाईच नाही तर 'या' गोष्टींवरही नियंत्रण ठेवा; निरोगी आरोग्यासाठी रामबाण उपाय