Winter Health Tips : थंडीच्या दिवसांत घसा खवखवणे आणि कफ येणे ही सामान्य लक्षणं आहेत. पण कधी कधी घशात काहीतरी अडकले आहे असे वाटते. अशा परिस्थितीत काय करावे हे समजत नाही. मात्र, ही काही मोठी समस्या नाही. घशात काही अडकलं असेल तर तुम्ही ते घरगुती उपायांनी देखील बरे करू शकता. प्रदूषित हवा आणि शरीराला योग्य नसलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास असे होते. त्यामुळे तुम्हाला घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटते.
या समस्येपासून आराम कसा मिळेल?
मधाचे सेवन करा :
न्याहारी आणि अन्न खाल्ल्यानंतर घशाला त्वरित आराम मिळण्यासाठी एक चमचा मध घेऊन ते चाटावे. मध अँटी-बॅक्टेरियल प्रभावाने समृद्ध आहे. त्यामुळे घशाच्या समस्येत त्वरित आराम मिळतो. काही लोक गरम पाण्यात मध मिसळून प्यायचा सल्ला देतात, पण असे करू नका. गरम पाण्यात मध वापरू नये. कोमट पाण्यात तुम्ही मध वापरू शकता.
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा :
याशिवाय तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता. त्यामुळे घशात साचलेले इतर विषारी पदार्थ बाहेर येतील. ही पद्धत देखील प्रभावी आहे.
आल्याचा काळा चहा :
सकाळी गुळण्या केल्यानंतर तुम्ही काळ्या चहाचे सेवन करू शकता. हा चहा तयार करण्यासाठी तुम्ही आल्याचा वापर करा. जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवणार नाही.
तुळशीची पानं खा :
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या घशाच्या संसर्गापासून आराम मिळतो. तुम्ही तुळशीची पानं कच्ची किंवा पाण्यात उकळून खाऊ शकता.
याशिवाय तुम्ही काहीच न करता अगदी साध्या पाण्याचे सेवन केले तरीही तुम्हाला या समस्येपासून आरोम मिळेल. यासाठी जेव्हा तुमचा घसा खवखवत असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :