Winter Health Tips : असं म्हटलं जातं की थंडीत तुमचा त्रास दुप्पट पटीने वाढतो. म्हणजेच जर तुम्हाला एखादी जुनी दुखापत झाली तरी तुम्हाला हिवाळ्यात त्याचा त्रास अधूनमधून जाणवतो. थंडीच्या दिवसांत संपूर्ण शरीर सुन्न होत असले तरी बहुतेक वेळा आपण बाहेर पडताना कान (Ear) थंड आणि बधीर होतात असे आपल्याला वाटते. त्यामुळे एकतर उबदार कापडाने कान झाकून ठेवते. तुम्ही कधी विचार केला आहे का की कान सुन्न झाल्यामुळे असे का होते? चला तर मग जाणून घेऊयात की केसांच्या आत झाकलेल्या कानाला इतकी हवा कशी लागते की त्यामुळे ते सुन्न होतात. जर तुम्हाला कारण माहित असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 


हिवाळ्यात कान सुन्न का होतात?


कानात वेदना होणे किंवा कान सुन्न होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. परंतु, हे एक प्रकारचं कानाच्या संसर्गाचं लक्षण देखील आहे. जर तुमचे कान बधीर झाले असतील तर काळजी करू नका, हे इन्फेक्शन नसून तुमच्या कानात सर्दी झाल्यामुळे आहे. कडाक्याच्या थंडीत हवा मिळण्यासाठी आपण आपले कान उघडे ठेवतो तेव्हा आपले कान सुन्न होतात किंवा वेदना सुरू होतात. याशिवाय, जर तुम्हाला सर्दी झाली असेल, तर यामुळे तुमच्या नाकातून कानापर्यंत येणा-या युस्टाचियन ट्यूबमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता असते, ज्यामुळे कान दुखू शकतात. यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, थंडीत कान अधिकतर झाकून ठेवावे. त्यामुळे थंडीपासून बचाव होऊ शकतो. अनेक वेळा आपण कानदुखीच्या समस्येकडे दुर्लक्ष करतो, परंतु काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 


कान दुखू नयेत यासाठी 'अशी' घ्या काळजी : 


हिवाळ्यात कानाचा त्रास होऊ नये यासाठी काही ठराविक काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की, कानावर नेहमी टोपी किंवा मफलर घाला. तसेच, तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर कान उघडे ठेवू नका. आजकाल कान झाकण्यासाठी अशा अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत, ज्या स्टायलिश दिसतात आणि थंड वाऱ्यापासून कानांचे संरक्षणही करतात. याशिवाय बर्फाच्या ठिकाणी किंवा प्रवासातही कान मोकळ्या हवेत ठेवू नका. जेव्हा तुमचे कान सुन्न होतात तेव्हा ते झाकून घ्या. यामुळे तुमच्या कानाला होणारी सर्दी काही वेळाने बरी होईल. चेहऱ्याबरोबर कानाचीही विशेष काळजी घेतल्यास तुम्हाला त्रास होणार नाही. 


त्याचबरोबर जास्त इअरफोन्सचा सुद्धा वापर जास्त वेळ करू नका. तसेच, कमी आवाजात गाणी ऐका. यामुळे तुमच्या कानाच्या पडद्याला दडे बसतात. आणि कानदुखीचा त्रास सुरु होतो ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर पडू शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Winter Health Tips : हिवाळ्यात नाकातून पाणी येतं का? वेळीच सावध राहा; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात