Winter Health Tips : हिवाळा हा ऋतू जरी आनंंददायी असला तरी मात्र याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यात, लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. असे अनेक लोक आहेत ज्यांना सकाळी उठल्याबरोबर शरीरात वेदना होतात. चांगली झोप लागली असली तरीही नेहमी थकवा जाणवतो. तर, ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो त्यांच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात. तज्ञांच्या मते, हिवाळ्यात शरीराच्या हालचाली फार कमी प्रमाणात होतात. त्यामुळेच बहुतेक लोकांचे शरीर आणि स्नायू दुखतात. हिवाळ्यात शरीराला फारसं ऊन मिळत नाही किंवा कोणी ते घेत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते, ज्यामुळे हाडे आणि सांधे दुखू लागतात. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही हिवाळ्यात हाडे आणि सांधेदुखीच्या समस्या दूर करू शकता.
वेदना टाळण्यासाठी काय करावे?
व्यायाम : जर तुम्ही वृद्ध असाल तर तुम्हाला थंडीचा जास्त त्रास होतो. व्यायाम न केल्याने समस्या आणखी वाढतात, ज्यामुळे जास्त वेदना होतात. अशा स्थितीत तुम्ही नेहमी शारीरिक हालचाली करत राहा. त्याचबरोबर व्यायामही करा.
हायड्रेटेड राहा : वर्षभर हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. परंतु, हिवाळ्यात हे सर्वात महत्वाचे आहे. उन्हाळ्यात तुम्ही भरपूर पाणी पिण्याचा विचार करता, परंतु हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
थंड हवेच्या संपर्कात येणे टाळा : हिवाळ्यात, थंड हवेच्या संपर्कात आल्याने शरीरात वेदना होतात, म्हणून शक्यतो घरी राहून ते टाळण्याचा प्रयत्न करा. परंतु जर तुम्ही काही कारणांमुळे बाहेर असाल तर पूर्ण बाह्यांचे कपडे, स्वेटर घालून डोके झाकून ठेवा.
योग्य आहार घ्या : वृद्ध किंवा तरुण ज्यांना सांधेदुखीचा त्रास होत असेल त्यांनी ते टाळण्यासाठी क, ड आणि के जीवनसत्त्वे असलेले अन्न खावे. हिवाळ्यात पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांसारख्या गोष्टींचा समावेश करा. त्यात कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात जे हाडे आणि सांधे यांचे आरोग्य सुधारतात.
स्ट्रेचिंग करा : स्नायूंना आराम देण्यासाठी आणि सांधेदुखी टाळण्यासाठी स्ट्रेचिंग व्यायाम उत्तम आहे. याशिवाय सायकल चालवणे, नियमित व्यायामात चालणे, एरोबिक करा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
झोपेतून उठल्याबरोबर वॉर्म अप करणे आणि सांधेदुखीचे साधे स्ट्रेच केल्याने फायदा होऊ शकतो. याशिवाय कोमट पाणी प्यायल्यानेही मदत होईल. नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि ओमेगा -3 सारखे पूरक देखील वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :