Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. या पर्वात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या पाच स्पर्धकांचा 'टॉप 5'मध्ये (Top 5) समावेश झाला आहे. जाणून घ्या 'टॉप 5' (Top 5 Contestants) स्पर्धकांविषयी...


अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) : 


टिकट टू फिनालेचा टास्क जिंकत अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची फायनलिस्ट ठरली आहे. अपूर्वा पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली. 


अक्षय केळकर (Akshay Kelkar)


बिग बॉस मराठीच्या घरातील एक मास्टर माइंड चेहरा म्हणजे अक्षय केळकर. अक्षय केळकर हा मालिका जगतात गाजलेला कलाकार. बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. 


किरण माने (Kiran Mane)


बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील वादग्रस्त स्पर्धक म्हणून किरण मानेची गणना केली जाते.  'मुलगी झाली हो' या मालिकेत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते, त्यानंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हा वाद अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. 


अमृता धोंगडे (Amruta Dhongade)


'मिसेस मुख्यमंत्री' फेम अमृता धोंगडेने 'बिग बॉस मराठी 4'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.  ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात मिसेस मुख्यमंत्र्यांची जादू पाहायला मिळाली. अभिनयाच्या क्षेत्रात अमृतानं 'मिथुन' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे. हा अमृताचा सिनेमा 13 जुलै 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


राखी सावंत (Rakhi Sawant)


मनोरंजन विश्वात सतत चर्चेत असणारं आणि गाजलेलं नाव म्हणजे राखी सावंत. तिला कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हटले जाते. राखीने  सतत लाइमलाइटमध्ये राहणं ही भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट सहज करून दाखवली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात एंटरटेन्मेंट क्वीन राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि खेळाला तडका लागला. तिच्या येण्याने बिग बॉसच्या घराला चार चॉंद लागले. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : दावेदार सगळेच, पण विनर एकच; कोण होणार 'बिग बॉस मराठी 4'चा महाविजेता?