Winter Health Tips : हिवाळ्या (Winter Season) थंडीपासून रक्षण करण्यासाठी आपण उबदार कपडे (Cloths) घालतो. असे करून शरीर पूर्णपणे झाकण्याचा आपण प्रयत्न करतो. अशा वेळी हाय नेक (High Neck) स्वेटर देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अनेकदा गरज आणि फॅशनच्या (Fashion) नादात या हाय नेकच्या स्वेटरचा वापर तर केला जातो. पण, तुम्हाला माहित आहे का, कही हाय नेक गळ्याचे स्वेटर वापरल्याने तुमच्या गळ्याला खाज सुटू शकते. ज्या लोकांची त्वचा खूप संवेदनशील आहे त्यांनी चुकूनही हाय नेकचे स्वेटर वापरू नयेत. यामुळे तुम्हाला मानेला, गळ्याला डाग, पिंपल्स, मोठे फोड, आणि रॅशेस येऊ शकतात. तसेच, हाय नेकमुळे तुमची त्वचाही कोरडी होऊ लागते.
हाय नेकचे स्वेटर घातल्याने अनेकदा मानेला खाज येते. यापासून जर संरक्षण करायचं असेल तर तुम्ही क्रीम लावू शकता. यामुळे तुम्हाला लगेच आराम देखील मिळेल. तसेच, यामुळे तुमची जळजळ, आणि खाज देखील कमी होण्यास मदत होईल.
हाय नेकचा स्वेटर घालण्यापूर्वी क्रीम वापरा
हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होऊ लागते. हाय नेकचे स्वेटर कोरड्या त्वचेवर घातल्यास शरीराला खाज सुटू लागते. आणि त्वचा लालसर होते. यासाठी तुम्ही जेव्हाही हाय नेक स्वेटर घालणार असाल तेव्हा मॉईश्चराईझ लावा. त्वचेला व्यवस्थित मॉइश्चरायझ केल्याने खाज कमी होते. तसेच, लालसरपणा आणि फोड्यांपासूनही तुम्हाला आराम मिळतो.
वारंवार गळ्याभोवती खाजवू नका
हाय नेकचा (High Neck) स्वेटर घातल्याने अनेकदा त्वचेला, मानेला खाज सुटते. म्हणून, जिथे हाय नेक असेल तिथे खाजवणे टाळा. कारण जितकी जास्त खाज येईल तितकी तुमची त्वचा लालसर होईल. त्यामुळे खाज सुटून रक्तस्त्राव सुरू होतो. तसेच, यामुळे इन्फेक्शन होऊन अनेक आजारांना आमंत्रण देखील मिळू शकतं. त्यामुळे शक्यतो वारंवार खाजवू नका.
यासाठी हिवाळ्यात स्वेटरची निवड करताना शरीराला टोचणार नाहीत, खाज सुटणार नाही अशा प्रकारच्या स्वेटरची निवड करा जेणेकरून तुम्हाला कोणतीच एॅलर्जी होणार नाही. तसेच, थंडीपासूनही तुमचं संरक्षण होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.