Yoga Benefits : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष 2024 (Happy New Year) ची सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अनेकांनी फिट राहण्याचे, हेल्दी राहण्याचे असे अनेक संकल्प केले असतील. पण, प्रत्येकाला हे संकल्प (Resolution) पूर्ण करता येतातच असेही नाही. अनेकजण कंटाळा करून आजची वेळ उद्यावर दवडतात. यावर्षी देखील अनेकांनी फिट राहण्यासाठी संकल्प केला असेल. पण, वेळेअभावी जर तुम्हाला जिमला, योगा (Yoga) क्सासला जाता येत नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोपी योगा आसनं सांगणार आहोत. तुम्ही घरी थोडा वेळ काढून ही योगासनं करू शकता.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, योगा आपल्या शरीरासाठी फार उपयोगी आहे. योगामुळे शरीरात लवचिकता तर येतेच पण अनेक आजारांपासूनही आपलं संरक्षण होतं.
ताडासन
योगाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर त्याची सुरुवात या आसनाने करा. हे आसन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवावं लागेल. पायांत अंतर ठेवल्यानंतर सरळ ताठ उभे राहा. आता हळूहळू दोन्ही हात वर करून जोडा आणि स्ट्रेच करा. काही वेळ अशा स्थितीत राहा आणि हळूहळू मूळ आसनात या.
पदहस्तासन
योगा सुरु करण्यासाठी दुसरं आसन म्हणजे पदहस्तासन. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला चटईचा वापर करावा लागेल. तुमची योगा चटई जमिनीवर नीट पसरवा आणि ताठ उभे राहा. आता हळूहळू तुमचे हात डोक्याच्या वर करून खाली न्या. आणि हळूहळू श्वास सोडा. हात कंबरेपर्यंत खाली वाकवा. यामध्ये तुमचे पाय तसेच, शरीराचा वरचा भाग ताठ असावा. आता दोन्ही हातांनी पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
हस्तोत्तनासन
हस्तोत्तनासन केल्याने तुमचे हात, पाय, खांदे, पाठीचा वरचा भाग आणि मानेमध्ये ताण येतो. या आसनामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी आपले दोन्ही हात जोडून सरळ उभे राहा. आता दोन्ही हात तुमच्या छातीपर्यंत आणा. आता दीर्घ श्वास घ्या आणि आपले दोन्ही हात डोक्यावर आणा. यावेळी तुमच्या दोन्ही हातांमधील फरक हा खांद्याच्या रूंदीएवढा असू द्या. हळूहळू वक्र आकार करून शरीराला मागे वाकवा. साधारणपणे 10 सेकंद या आसनात राहा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.