मुंबई : सध्या लोक जेवढं आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देतात. तेवढंच लक्ष ते आपल्या केसांकडे देतात. सौंदर्य वाढविण्यात केसांचा मोलाचा वाटा असतो. कारण तुमचं व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी केस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. अनेकदा आपण केसांची काळजी घेण्याच्या प्रयत्नात त्यांना नुकसान पोहोचवतो. त्यामुळे केसांची काळजी कशी घ्यावी आणि त्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींबाबत किंवा सवयींबाबत सांगणार आहोत, ज्या हिवाळ्यात तुमच्या केसांसाठी नुकसानदायी ठरतात.
गरम पाण्याने केस धुणं टाळा
हिवाळा सुरू होताच अनेक लोक आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? तुमची हिच सवय तुमच्या केसांसाठी नुकसानदायी ठरते. गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केसांमधील अनेक नैसर्गिक पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी कोमट पाणी किंवा साध्या पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने केस धुतल्याने केसांच्या मुळांनाही मुकसान पोहोचते. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं.
टॉवेलची काळजी घ्या
आंघोळीनंतर केस सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर केला जातो. हाच टॉवेल केसांना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवतो. नेहमी केस सुकवण्यासाठी आणि अंग पुसण्यासाठी वेगवेगळ्या टॉवेल्यचा वापर करा. तसेच केसांसाठी टॉवेलऐवजी कॉटनच्या कापडाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. बाजारात मायक्रोफायबर टॉवेल्स उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर तुम्ही करू शकता.
योग्य उशीचा करा वापर
झोपताना अनेकांना उशी लागते. तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की, तुमची उशीही केसांसाठी नुकसानदायी ठरते. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपताना नरम उशीचा वापर करणं अत्यंच आवश्यक आहे. यामुळे केसांना नुकसान पोहोचत नाही.
टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
हिवाळ्यात फेशिअल करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!
सावधान! त्वचेसाठी 'या' उत्पादनांचा वापर करणं ठरू शकतं घातक